प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राचा असा काढला काटा

हरिद्वार / नवप्रहार न्यूज नेटवर्क
ते दोघे पेशाने ट्रक ड्रायव्हर असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. हेमेन्द्र असे एकाचे तर मोहम्मद शारुफ असे दुसयाचे नाव. मैत्री झाल्याने शारुफ चे हेमेन्द्र च्या घरी येणेंजाने वाढले. शारूफ आणि हेमेन्द्र च्या पत्नीच्या अनैतिक संबंध बनले. ही बाब हेमेन्द्र च्या लक्षात आल्यावर त्यांनी दोघांना टोकले आणि शारुफ चे घरी येणेंजाने बंद केले.त्यामुळे हेमेन्द्र ची पत्नी आणि शारुफ च्या भेटीगाठी बंद झाल्या. यामुके दोघे कासावीस झाले. थांनी हेमेन्द्र नावाच्या काट्याला रस्त्यातून साफ करण्याचा प्लान आखला. त्याला जेवणासाठी बोलावून त्याची हत्या केली आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला. पोलिसांना मृतदेह मिळाल्यानंतर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. मात्र अखेर प्रकरणाचा पर्दाफाश झालाच. पोलिसांनी मयताची पत्नी आणि मित्र दोघांनाही अटक केली आहे.
पेशाने ट्रक चालक असल्याने कामाच्या ठिकाणी दोघांची मैत्री झाली
हेमेंद्र असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पेशाने ट्रक चालक आहे. आरोपी मोहम्मद शारुफ हा देखील ट्रक चालक आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. मग मोहम्मदचे हेमेंद्रच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. यादरम्यान मोहम्मदचे हेमेंद्रच्या पत्नीशी प्रेमसंबंध जुळले. तब्बल सहा वर्ष दोघांचे चोरी छुपे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र याची माहिती हेमेंद्रला मिळाल्यानंतर त्याने यास विरोध केला. यामुळे मोहम्मद आणि हेमेंद्रच्या पत्नीने त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचला.
जेवणाच्या बहाण्याने बोलावून हत्या केली
मोहम्मदने 11 मार्च रोजी हेमेंद्रला जेवायला जायच्या बहाण्याने भगवानपूरला बोलावले. मग तेथे त्याला भरपूर दारु पाजली आणि दारुच्या नशेत असताना त्याची हत्या केली. हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला. यानंतर 10 दिवसांनी हेमेंद्रच्या पत्नीने सासरच्यांना तो गायब असल्याची माहिती दिली. हेमेद्रच्या वडिलांनी मोहरपाल पोलिसात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पत्नीच्या सीआर रिपोर्टमुळे सत्य उघड
बेपत्ता हेमेंद्रचा शोध घेत असतानाच पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय येत होता. पोलिसांनी पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट मागवला. यात पत्नीचे दररोज एका व्यक्तीशी बोलणे होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हेमेंद्रचे शेवटचे लोकेशन तपासले असता या नंबरचे आणि हेमेंद्रचे शेवटचे लोकेशन सारखेच होते. यावरुन पोलिसांनी पत्नी आणि मोहम्मदला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर हेमेंद्रच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी दोघांना अटक केली.