अंजनगाव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
अंजनगाव सुर्जी – (मनोहर मुरकुटे)
जिजाऊ ब्रिगेड अंजनगाव सुर्जी तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.सकाळी ११ ते ६ या वेळात पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबीरात प्रा.प्रेमकुमार बोके यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.जिजाऊ ब्रिगेड हे महाराष्ट्रातील लाखो महिला कार्यकर्त्यांचे नावाजलेले संघटन आहे. मागील २५ वर्षापासून जिजाऊ ब्रिगेड महिलांचे प्रश्न घेऊन कार्य करीत आहे.हे कार्य करीत असतांना महिलांना सर्व क्षेत्रातील ज्ञान असावे व त्यांच्यामधे नेतृत्व गुण विकसीत व्हावे यासाठी या शिबीराचे आयोजन होते. या माध्यमातून महिलांना सामाजिक,राजकीय, वैचारिक,शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणून त्यांना मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणे व त्यांचे सर्वांगीणदृष्ट्या सबलीकरण करणे यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांची प्रशिक्षण शिबीरे घेण्याचा निर्धार जिजाऊ ब्रिगेडने केला आहे. त्याचबरोबर महिलांना घातक रूढी,परंपरा ,कर्मकांड, बुवाबाजी, अंधश्रद्धा यापासून मुक्त करणे आणि विज्ञानवादी विचाराकडे वळवण्यासाठी प्रबोधन करणे या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले होते.अंजनगावात पार पडलेल्या या शिबिरात अनेक महत्वपूर्ण गोष्टींचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबीरासाठी प्रशिक्षक म्हणून प्रा.प्रेमकुमार बोके यांनी दोन सत्रात मार्गदर्शन केले.प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचवर,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा सीमा बोके,तालुका अध्यक्षा प्रिया गायगोले,निलेश ढगे, तर प्रशिक्षणार्थी मीना कोल्हे,स्मिता घोगरे,स्मिता लहाने,विद्या चोरे,प्रतिभा वडतकर,शुभांगी पांडे,रेखा मानकर,स्वाती लहाने,मनिषा सायखेडे,श्वेता झंवर,सुमित्रा भोंडे,सरला गोंडचवर,रसिका च-हाटे,उत्कर्षा सरोदे,सारीका मानकर,पल्लवी अढाऊ,तनया पांडे,स्वानंदी लहाने,आनंदी राऊतश्रेयश वडतकर उपस्थित होते.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिका-यांनी मेहनत घेतली.