प्रहार शिक्षक संघटनेणी केले ठाणेदार सुषमा बाविस्कर यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उद्घाटन.
वाटसरुची तहान भागवण्यासाठीचा सुप्त उपक्रम
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी येथील मुख्य रस्ता चौक एस पी एम कॉलेज समोर पाणपोइचे मा. सुषमा बाविस्कर ठाणेदार घाटंजी यांच्या शुभहस्ते प्रहार संघटना पुढाकारातुन उदघाटन करण्यात आले.
जनतेची तहाण भागवण्याचा उदात हेतूने राबविला हा उपक्रम
केवळ शैक्षणिक चळवळीच्या चौकटीत न राहता विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या प्रहार शिक्षक संघटना तर्फे गिलानी कॉलेज चौक घाटंजी येथे पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून घाटंजी पोलिस स्टेशन च्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर मॅडम, किरण भगत पुरवठा निरीक्षक, सेवानिवृत्त प्राचार्य पंजाबराव डंभारे, होनबाजी डंभारे, पांडुरंग निवल उपस्थित होते.
घाटंजी तालुक्याच्या टोकावरून 40 ते 50 किमी. वरून विविध कामानिमित्त येथे येणाऱ्या वृद्ध, महिला,लहान मुले,विद्यार्थी या सर्वांची तहान भागावी हा उदात्त हेतू पुढे ठेवून ही संकल्पना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे यांनी प्रत्यक्षात आणली पाणपोइला घाटंजी येतीलच एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्था ने दिली भेट. यावेळी प्रहार संघटने तर्फे पत्रकार संस्था पगाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.मागील वर्षी सुद्धा उन्हाळ्यात त्यांच्या पुढाकाराने ही पाणपोई सुरू होती
यावेळी किशोर मालवीय तालुका अध्यक्ष, संतोष चौधरी तालुका सचिव, विनोद लोखंडे,आशिष जमदापुरे, पवन राऊत, मुकेश पसावत, किशोर मुनेश्वर,वीरेंद्र खडसे, सतीश गणवीर, गुलाब सिसले, सुरेश कस्तुरे, भगवान सरदार, अभय इंगळे, प्रफुल वातीले, प्रशांत दीडशे,पवन राठोड, आकाश ठाकरे, झाडे सर, प्रा. रवी आडे, प्रा प्रवीण गोडीले, संतोशभाऊ येंनरवार,जुनेद नुर, राजेश वानखडे,सचिन बागडे, सुमित ढगले व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वानखडे यांनी तर आभार निखिल पांगुळ यांनी केले यशस्वितेसाठी प्रशांत चौधरी, योगेश निमकर, नंदुभाऊ चौलमवार, नितीन येल्लरवार यांनी सहकार्य केले.