सिंहाचा इसमावर हल्ला पण …….
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
सिंह हा हिंस्रक पशु आहे. सिंहाला जंगलाच राजा देखील म्हटल्या जाते. पण अश्या हिंस्रक पशूंना पाळण्याचा ट्रेंड काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सिंहाला कुत्र्यासारखे वागवंतांना किंवा त्याच्या सोबत कुत्र्यासारखे खेळतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. साध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती पाळलेली दोन सिंहाकडे जाताना दिसत आहे. तो त्यापैकी एकाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असताना सिंह त्याचा हात जबड्यात घेतो. इतक्यात एक माणूस येऊन सिंहाला बाजू करतो. त्यामुळे त्याचा जीव बचावतो.
सिंह आपल्याला हल्ला करतील हे या व्यक्तीला माहीत नव्हतं. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. ही क्लिप @zahidkhizar786 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
व्हायरल क्लिपमध्ये दोन पाळीव सिंह एका व्यक्तीकडे जाताना दिसत आहेत. त्यापैकी एकाने या व्यक्तीला पकडलं पण सुदैवाने त्याला फार इजा होत नाही. सिंहाने त्याचा हात जबड्यात पकडल्याचं दिसतं. मात्र, इतक्यात दुसरा एक व्यक्ती तिथे येतो आणि या व्यक्तीला सिंहाच्या तावडीतून सोडवतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘माझ्यावर सिंहाचा धोकादायक हल्ला’.
हा व्हिडिओ नेटिझन्सनी लाखो वेळा पाहिला असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने विचारलं की, “सिंहाला पाळीव प्राणी म्हणून ठेवणं कायदेशीर कसं आहे? तो आपल्या घरात वन्य प्राणी कसा ठेवतो? हे कायद्याच्या विरोधात आहे.” दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं की, “सिंहांना पाळीव प्राणी म्हणून ठेवलं जात नाही. त्यांना मोकळ्या जागेत मुक्तपणे फिरू द्यावं.” तर तिसऱ्यानेही कमेंट करत म्हटलं, की त्यांना त्या भीतींमधून मुक्त करा.