सामाजिक

अ. भा.ग्रामीण पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत

Spread the love

 

ग्रामीण क्षेत्रातील वृत्त संकलन करणारा पत्रकार लोकशाहीचा कणा आहे.
-रवींद्र तिराणिक

जिल्हाध्यक्षपदी शशिकांत मोकाशे, कार्याध्यक्षपदी किशोर पत्तीवार, जिल्हा महासचिव प्रदीप कोहपरे, जिल्हा संपर्क प्रमुख पदी अॅड्. गौरव स्वामी

जिल्ह्यातील तालुकानिहाय्य अध्यक्षांची नियुक्ती

चंद्रपूर / प्रतिनिधी

चंद्रपूर महानगरपालिका विभाग डाँ. प्रा.सचिन बोधाने,वरोरा तालुका अध्यक्ष सादिक थैम , चिमूर तालुका अध्यक्ष विनोद शर्मा, कोरपणा तालुकाध्यक्ष दीपक खेकारे
गडचांदूर अध्यक्ष हबीब शेख, भद्रावती अध्यक्ष गणेश पेंदरे यांची नियुक्ती
—————————————- विविध समस्याशी झुंज देत
ग्रामीण क्षेत्रात निर्भिडपणे काम करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा असून ,चौथा आधारस्तंभ आहे असे वक्तव्य बैठकी प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी केले.
संपूर्ण भारतामध्ये किमान २५वर्षापासून कार्यरत असलेल्या एकमेव अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापु देशमुख यांच्या मार्गदर्शक सूचना व आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या अध्यक्षतेखाली भद्रावती येथील श्री साई आयटीआय सेमिनार हॉलमध्ये पत्रकार संघाच्या विशेष बैठकीत चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली.
भद्रावती येथील जैन मंदिर रोड, श्री साई आयटीआय सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय विशेष बैठकीत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष शशिकांत मोकाशे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या कार्यकारणीत वरोरा, भद्रावती, चिमूर ,चंद्रपूर, कोरपणा, गडचांदूर, राजुरा ,पोंभुर्णा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. जिल्हा कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पत्तीवार, जिल्हा महासचिव प्रदीप कोहपरे, सहसचिव प्रा. अनराज टिपले चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख अँड. गौरव स्वामी, चंद्रपूर- गडचिरोली संपर्कप्रमुख गोपी मित्रा, (चंद्रपूर -ग्रामीण )संपर्कप्रमुख नितीन टहलानीया, चंद्रपूर -गडचिरोली संघटक चिंतामण आत्राम, जिल्हा ग्रामीण संघटक सुरेश बांगडकर ,जिल्हा उपाध्यक्ष विनोद शर्मा,
कोषाध्यक्ष अरुण ठवसे,
जिल्हा विशेष सल्लागार मार्गदर्शक
मुकेश वाळके, सुरज गोरंतवार
प्रसिद्धी प्रमुख मिलिंद वाकडे. चंद्रपूर
जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून चंद्रपूर महानगरपालिका विभाग
प्रा. सचिन बोधाने ,वरोरा तालुका अध्यक्ष सादिक थैम, चिमूर तालुका अध्यक्ष विनोद शर्मा, कोरपणा तालुकाध्यक्ष दीपक खेकारे, गडचांदूर अध्यक्ष हबीब शेख, भद्रावती गणेश पेंदरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघातील पदाधिकारी व सदस्यांचा,( सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व साहित्य इतर क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या) विविध पुरस्कार प्राप्त मंडळी प्रा. अनराज टिपले ,परमानंद तिराणिक ,प्रकाश पिंपळकर , चंद्रकांत पोईनकर, श्रीपाद बाकरे शारदाताई खोब्रागडे आदींचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघविशेष सभा बैठकीचे प्रास्ताविक शशिकांत मोकाशे जिल्हाध्यक्ष यांनी केले. सूत्रसंचालन गौरव चामाटे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close