सामाजिक
53 वर्ष संगोपन करणारा आधार’ ‘ श्रीराम ‘ हरपला ; पसारी बंधू भावनाविवश
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
म्हणतात नं की नातं फक्त रक्ताचे असले तरच जिव्हाळा असतो. पण काही वेळा रक्तातील नात्यापेक्षाही जपलेली नाती ही मनाला सुख आणि समाधान देतात. परका असून सुद्धा जिव्हाळा लावलेला व्यक्ती सोडून गेला किंवा दुरावला तर त्याचे मनाला तितकेच दुःख होते जेव्हढे नात्यातील माणूस जाण्याने. पसारी बंधू यांचे बालपणापासून संगोपन करणारा ‘ श्रीराम ‘ आता पुन्हा कधीच न परतण्यासाठी निघून गेल्याने पसारी बंधू यांचा ‘ आधार ‘ हरपला आहे. आणि त्यामुळे ते भावनाविवश झाले आहेत.
ज्याप्रमाणे पक्षी आपल्या पाखरांकरिता आणि आई-वडील आपल्या बाळाचे शिशुअवस्थे पासून तर स्वतः जिवंत असेपर्यंत आजीवन जतन करतात असच घडलं आहे पसारी व स्वर्गीय श्रीराम खंडारे यांच्या बाबत तब्बल ५३ वर्षापर्यंत पसारी परिवारातील दोन भावंडांचे जतन आणि अविरत सेवा करणारे श्रीराम खंडारे यांचे निधन झाले या घटनेने पसारी कुटुंबीयाचे अश्रू आणि हृदयातील वेदना असह्य झाल्याचा प्रत्यय येथे निदर्शनास आला
जन्म होणे, मृत्यू होणे हे जरी अटळ असले तरी काहींचा जन्म आणि काहींचा मृत्यू हा अनमोल तसेच जीवनातील पोकळी न भरून निघणारा असतोच येथील प्रसिद्ध पत्रकार चेतन पसारी व श्याम प्रिंटर्सचे संचालक भरत पसारी हे शिष्यवस्थेपासूनच दिव्यांग परंतु या दोघांनी आपली पत्रकारिता आणि व्यवसायाचा सांभाळच केला नव्हे तर समाजाकरिता एक मिसाल(उदाहरण) म्हणून सर्व परिचित आहेत अशा बंधूंची सेवा करण्याकरिता वडील छगनलाल पसारी यांनी नारगावंडीचे अत्यंत गरीब कुटुंबातील श्रीराम खंडारे यांना दोन्ही दिव्यांग मुलांच्या दिवसभरातील सर्व विधी करण्याकरिता म्हणून कामावर ठेवले खंडारे यांचे सेवा करता करता दिवस महिने आणि पन्नास वर्षे निघून गेलेत या ५३ वर्षात श्रीराम खंडारे केवळ एक कामकरी नव्हे तर पसारी परिवारातील घरातील सदस्य झालेत काही वर्षांपूर्वी खंडारेंचा मुलगा मृत्युमुखी पडला अशावेळी सुद्धा पसारी परिवार खंडारे सोबत खंबीरपणे उभे राहिलेत पसारी परिवारा चे श्रीराम भाऊ सोबत इतके मायेचे संबंध होते की, पसारी कुटुंबीयांनी श्रीराम भाऊच्या नातीचे लग्न थाटामाटात लावले परंतु मायेचा पाखर आणि पितासामान असलेल्या श्रीराम भाऊ चे काल निधन झाले तेव्हा पसारी कुटुंबीयातील चेतन व भरत यांनी सर्वस्व गमावल्यासारखे झाले या भावंडांचे अश्रू थांबत नव्हते एवढा जिव्हाळा श्रीराम भाऊ सोबत यांचा होता शेवटी नियतीला जे मान्य आहे ते करावंच लागतं चेतन, भरत आणि त्यांचे वडील छगनलाल पसारी,मोठा मुलगा पत्रकार राजू पसारी यांनी श्रीराम खंडारे यांच्या अंत्यविधीची अश्रू पूर्ण नयनांनी जबाबदारी पार पाडली राजू पसारी यांची मुलगी जी एक अमेरिकेत आहे व दुसरी पुण्याला आहे या दोघींना जेव्हा श्रीराम भाऊंच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे अंत्यविधी पाहण्याचा हट्ट धरला आणि आणि व्हिडिओ कॉन्फरन्स वरच ढसाळ ढसाळ रडायला लागल्या यावरूनच श्रीराम खंडारे व पसारी कुटुंबातील आत्मीयता कळते
आमचे छत्र हरपले…. चेतन व भरत पसारीआमच्या शिशु, बाल आणि तरुण या तिन्ही अवस्थांमध्ये श्रीराम भाऊंनी आमची खूप सेवा केली नव्हे तर आम्हाला अनमोल असे सहकार्य केले श्रीराम भाऊंचे निघून जाणे म्हणजे आमच्याकरिता आमचे छत्र आमच्यावरून निघून झाल्यासारखे झाले आहेत श्रीराम भाऊंना नतमस्तक अशा भावनावष प्रतिक्रिया पत्रकार चेतन व भरत पसारी यांनी याप्रसंगी दिल्यात
Tags
आधार हरपला