काळी माय अन् गोठ्यातली गाय जगेल तरच आपण जगू !
आपल्याला विषमुक्त अन्न देणारी काळी माती (माय) म्हणजेच शेती आणि भारतीय वंशाची गोठ्यातली गाय जगेल तरच मानवाच्या पिढ्या सुखाने जगतील, नाहीतर अनेक रोगराईचा सामना करत या मानव जातीला करावा लागेल असे स्पष्ट मत जैवीक मिशनचे पुरस्कर्ते नंदकिशोर गांधी यांनी मांडले आहे. दैनिक महासागरला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुद्द वसुंधरेकरिता प्रत्येकांनी कशा प्रकारे पुढाकार घ्यायला हवा याबाबत सखोल माहिती दिली. –
नंदकिशोर गांधी यांनी सांगितले की, आज विषमुक्त शेतमाल हा विदेशात निर्यात होत आहे, आणि विषाक्त माल, ज्यामध्ये कडधान्य, पालेभाज्या, फळ इत्यादी असा माल आपण खातो. त्यामुळेच आपल्याला मधुमेह, कर्करोग, हृदयविकार असे एक ना अनेक रोग जडत आहे. या सर्वांचे मुळ पाहीले तर शेतीमध्ये वापरण्यात येणारे कीटकनाशक कीटकनाशकामुळे जमिनीची पोत खराब होत आहे
कीटकनाशक
फवारलेला, | चारा गायीचा पोटात जात आहे. त्यापासून तयार ‘होणारे दूध हे सर्वकाही विषाक्त आहे. यापासून वाचायचे असेल तर जैवीक शेतीवर जोर दिला पाहीजे. तिच जनजागृती आम्ही करित आहे. विषाक्त आहार घेवून तुम्हीकितीही व्यायाम केला किंवा कितीही औषध घेतली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळेच आम्ही जैवीक अन्नधान्य पुरविणारे प्राकृतिक कामधेनू केंद्र सुरु केले आहे. याठिकाणी कमी भावात शुध्द अन्नधान्य, पालेभाज्या व फळं आम्ही उपलब्ध करुन देतो. असेही गांधी यांनी सांगितले.
🚩🚩🚩पेस्टीसाईड आणि प्लास्टीक वसुंधरेचे शत्रु🚩🚩🚩
गांधी यांनी सांगितले की, पेस्टीसाईट (किटकनाशक) आणि प्लास्टीक वसुंधरेचे शस्त्रु आहे, आणि आपण या दोन शत्रुचा रोज सर्रास वापर करित आहोत. बाजारात जातो तर कापडी पिशवी नेत नाही. तेथून मिळणारी प्लास्टीक पिशवीतच बाजार आणतो. घरी भाजीचे देठ तोडून त्या पिशवीत टाकतो आणि तीला गाठ मारून तो कचऱ्याच्या ढीगावर टाकतो. त्यानंतर गाय या पिशवीतला हिरवा चारा पाहून ती खाते, पोटात प्लास्टीक विरघडत नसल्याचे काही दिवसांनी गाय चारा खाऊ शकत नाही आणि ती दगावते. हा प्रकार विकासाकडे नेणार नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहीजे.
पुरस्कार आणि यश: JCI पुरस्कार 2015
वसुंधरा मित्र पुरस्कार 2016
पर्यावरण गौरव पुरस्कार 2018- MPC बोर्ड आणि ECI, पुणे द्वारे प्रदान केला जातो.
पर्यावरण, प्रदूषण, जलसंवर्धन वृक्षारोपण यावर चार माहितीपट तयार केले.
सखी सह्याद्री मराठी दूरदर्शन वाहिनीवर चार कार्यक्रम. अमरावती आणि बीड येथे आकाशवाणीचे कार्यक्रम
सॅम टीव्ही चॅनलवर माहितीपट प्रदर्शित झाला. मध्ये “अविनाशी पण विनाशकारी प्लास्टिक” नावाचे प्लॅस्टिक धोक्याचे पुस्तक प्रकाशित झाले.
एम वर्ल्ड युथ ऑर्गनायझेशनचा एनव्हायरो नॅशनल एन्व्हायर्नमेंटल एक्सलन्स अवॉर्ड-2022 संबंधित समस्यांवरील विविध परिसंवाद, जागरूकता भाषण आणि कार्यक्रम
युथ फोरम ऑफ इंडिया.
नंदकिशोर गांधीचा अल्प परिचय
गायीच्या पोटात 40 ते 50 किलो प्लास्टीक निघाल्याने नंदकिशोर गांधी यांनी व्यथित होवून वर्ष 2013 पासून प्लास्टीक बंदी या विषयावर काम सुरु केले. प्लास्टीक बंदीकरिता महाराष्ट्रभर 848 सेमिनार घेतले, जनजागृती केली, सतत निवेदने देत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केल्याने 23 मार्च 2018 ला राज्यात प्लास्टीक बंदीचा निर्णय झाला. लोकांना कापडी पिशवी वापरण्याकरिता जनजागृती केली. तीन वर्षात 30 हजार हून अधिक कापडी पिशव्यांचे वितरण केले. ऑल इंडीया रेडीओ, दुरदर्शनच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या कामधेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्रात, जैविक मिशनचे कार्य घरोघरी पोहचविण्याचे काम करत आहेत.
नागरिकांना गोआधारित शेतीचे उत्पादन उपलब्ध करुन देत आहे.
निसर्ग मित्र किशोर देशमुख सोबत प्लास्टिक बंदी वर अंमलबजावणी व्हावी आणि विषमुक्त शेती करण्याकरिता जैविक मिशन मध्ये काम करीत आहे.