चिऊ ताई ये चारा खा, पाणी पी भुर्र उडून जा समाजकार्य विद्यार्थ्यांचा उपक्रम

आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी. न्यू आर्टस् कॉलेज वर्धा येथील समाजकार्य विभागाचे विद्यार्थी सुयोग शेंडे यांनी केले स्तुत्य उपक्रम. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, तापमानात वाढ होत आहे, नदी नाल्यामधील पाणी आटले आहेत. त्यामुळे पक्षांसाठी पाण्याची, धान्याची व्यवस्था करण्यात आली.
समाजकार्याचा विद्यार्थ्यानं तर्फे पक्षांसाठी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे
उन्हाळ्याची चाहूल लागताच पक्षांना पिण्याचे पाणी आणि खायला अन्न याची चणचण भासत असते अशातच पक्षांना पाणी आणि अन्न मिळावे यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमांतर्गत त्यांनी मातीच्या भांड्यात उपयोग करतात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि अन्नाचे दाणे त्यामध्ये ठेवण्याचे आणि ते शहरातील विविध ठिकाणी लावण्याचे ठरवले आहे। दिवसेंदिवस चिमणी, कावळे व पक्षी दुर्मिळ होत चाललेले आहेत तसेच ना भीषण उन्हाळा बघता बऱ्याच वेळी पक्षांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांचा जीव सुद्धा जातो। दहा ते 15 ठिकाणी आहे भांडे लावले असून पुन्हा कमीत कमी पन्नास मातीचे भांडे पक्षांसाठी पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य ठेवण्यात येणार आहे। हे भांडे अथवा तेलाचे पिपे झाडांवर लावण्यात येणार आहे जेणेकरून पक्ष्यांना पाणी आणि धान्य घेता येईल.
या अभिनव उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे।
या उपक्रमाला मार्गदर्शक प्रा.संदीप गिरडे ,डॉ निशांत चिकाटे,प्रा.आशिष ढगे,प्रा. सिध्दार्थ धोके,प्रा धनश्री वाघ
तर या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी ..सुयोग शेंडे,शामली कुसले,दिव्या कुंभारे,प्रणाली वासेकर,श्वेता दांडेकर,अंजली म्हस्के,दिव्या लटारे,आकाश महात्मे,वृषभ फरकुंडे,सौरभ खोडे,श्वेता कोंडे,आकाश धुर्वे,लय गायकवाड,ऐश्र्वर मनवर,तेजस्विनी जाधव,स्नेहा मसुरकर,प्रमोद कुडमते, निखिता वाघमारे,जय गौरखेडे,तेजस भोंग,आदि विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.