महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त मासिक पाळी व महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन !
प्रतिनिधी मनोज जैन नायगांवकर
नागपूर : महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त मासिक पाळी आणि महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले होते. मिसेस बिंझानी कॉलेजमध्ये ९० हून अधिक मुलांना मासिक पाळीदरम्यान स्वत:ची काळजी आणि स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली!
आजच्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून सौ.सूचिता सरावगी, तसेच फील गुड फाऊंडेशनचे संस्थापक निकेश अंबादे , संघाचे सदस्य भावित जैन, वैष्णवी जाधव, बिंजानी कॉलेजचे सौ. यशश्री नंदनवार, चिटणीविस ट्रस्टचे जोशी मॅम उपस्थित होते
आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान वयातच मुलांना लवकर मासिक पाळी येत आहे आणि समाजात निर्माण झालेल्या रुखरुखांमुळे महिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी आमच्या फील गुड फाऊंडेशनच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली जात आहे, आतापर्यंत 1800+ हून अधिक शालेय विद्यार्थिनींना जागरुक करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले आहे आणि येत्या 28 मे 2023 मासिक पाळी स्वच्छता दिनापर्यंत 3000 शालेय विद्यार्थिनींना संघटना पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे