गुरुदेवांची टोपी घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा खुन – डॉ अविनाश वारजूकर
– बहुजन समाजाच्या घरावर भ्याड हल्ला
– पत्रकार परिषदेतुन आमदार बंटी भांगडीयाला अटक करण्याची मागणी
चिमूर -ता, प्र, डॉ,ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर — चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची टोपी घालून त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत चालन्याचा व त्यांचे विचार आत्मसात करून क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न आमदार बंटी भांगडीया राष्ट्रसंत गुरुदेवांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या भाषणातुन सांगत असतात मात्र गुरुदेवाची टोपी आणि गुरुकुंज मोझरीचे संचालक असलेल्याने कायदा हातात घेवून बहुजन समाजातील साईनाथ उर्फ अश्वमेध बुटके यांच्या घरावर जावून हल्ला करने व अशोभनिय कृत्य करने शोभते का असा प्रश्न करीत या घटनेचा काँग्रेस पार्टी जाहीर निषेध करीत असून गुरुदेवांची टोपी घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा एक प्रकारे खुन केल्याचे सांगत आमदार बंटी भांगडीया यांना विधान सभा अध्यक्षाची अनुमती घेवून अटक करण्याची मागणी चिमूर येथील कॉंग्रेस कार्यालयात मंगळवार ला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी महासचिव डॉ अविनाश वारजूकर यांनी आयोजीत पत्रकार परिषदेतून केली आहे.
साईनाथ उर्फ अश्वमेध बुटके यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्ट मध्ये कोनाच्या नावाचा उल्लेख नव्हता हा बहुजन समाजाच्या व्यक्तीवर घाला आहे. कार्यक्रमातुन गुरुदेवाचे विचार व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगनारे आमदार बंटी भांगडीयाने मोझरीच्या संचालक पदाचा राजीनामा दयायला पाहीजे. याचा अर्थ त्या पोस्ट चे समर्थन करतो असे नाही. आमदार असलेल्या व्यक्तीने कायदा हातात घेत कार्यकर्त्यासह बुटके पती पत्नीला मारहाण केली. ५०० ते ७०० लोकांचा जमाव पोलीस स्टेशनवर आनून कायदा व सुव्यवस्था बिगडविन्याचा प्रयत्न केला. दहशत माजवून क्षेत्रातील शातंता भंग करत महत्वाचे प्रश्न सोडून इतर प्रश्नाकडे लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे. गोसेखुर्द प्रकल्प तयार झाला सात वर्ष होत आहे अजून पर्यत परिसरातील पाणी मिळाले नाही पाणी कुठे मुरले ही वस्तूस्थिती आहे. बुटके यांच्या तक्रारीच्या अनुसंघाने पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी इतर मध्ये पून्हा कोन दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून विधान सभा अध्यक्ष यांची अनुमती घेवून आमदार बंटी भांगडीया सह इतरांना अटक करण्याची मागणी करत चिमूर प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांना निवेदन देवून पत्रकार परिषदेत वारजूकर यांनी सांगीतले.
तसेच २०१७ च्या जि प निवडणूकीत प्रचारात २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत शंकरपूर येथे गाड्या आडव्या करून उभ्या असलेल्या विरोधी उमेदवाराला धमकाविने बाहेर राज्यात जाऊन पोलीसांन सोबत वाद घालणे असे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात नमूद आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदण देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे महासचिव डॉ अविनाश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सेवादल सहसचिव राम राऊत, तालूका काँग्रेस कमेटी सेवादल अध्यक्ष किशोरबापू शिंगरे, चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ विजय गांवडे पाटील, माजी जि प अध्यक्ष सतिश वारजूकर, जेष्ठ काँग्रेस नेते संजय डोंगरे, तालूका काँग्रेस कमेटी ओबीसी सेल अध्यक्ष विलास डांगे, तालूका काँग्रेस कमेटी पर्यावरण सेल अध्यक्ष प्रदिप तळवेकर, चिमूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, तालूका काँग्रेस कमेटी सचिव विजय डाबरे, तालूका महिला काँग्रेस अध्यक्ष सविता चौधरी, तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आरीफ शेख, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष राणी थुटे, माधवबाबु बिरजे, कदीरचाचा, पप्पू शेख आदी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते.