सोमठाणा चेक पोस्टवरील घटना, आतापर्यंत 41 लाख 58 हजारजप्त
कारंजा प्रतिनिधी डॉ. गुणवंत राठोड
कारंजा(Karanja):- लोकसभा निवडणुकी(Election of Lok Sabha) दरम्यान चे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने कारंजा तालुक्यात कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा येथे चेक पोस्ट(Check post) उभारण्यात आले. या चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना सोमवारी 1 एप्रिल ला दुपारी 4 वाजताचे दरम्यान कारमधून 3 लाख 63 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.नेर वरून कारंजा येथे येत असताना मार्गातील सोमठाना चेक पोस्ट वर कारची तपासणी केली असता तपास पथक प्रमुख संतोष मिसाळ यांनी नजीब उल्ला खान अता उल्ला खान यांचे कडून ही रक्कम जप्त केली. त्यामुळे ही रक्कम जप्त करून ट्रेझरी (Treasury)मध्ये जमा करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात तपास पथक प्रमुख संतोष मिसाळ, विनोद महाकाळ, जितेंद्र साखरकर, संजय राठोड, धनंजय चौधरी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी केले.