शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल ; वाचा कुठली आहे घटना
वर्गातील मुलींना दाखवायचा अश्लील व्हिडीओ
गोंदिया / विशेष प्रतिनिधी
आई वडील हे मुलांचे प्रथम गुरू असे म्हटल्या जाते आणि ते खरे देखील आहे. कारण पाल्य हा जास्तीत जास्त काळ आपल्या पालकांसोबत असतो.पण शिक्षक (गुरू ) चे स्थान ने विद्यार्थ्यांच्या जीवनात आई वडिलां पेक्षाही मोठे आहे. कारण मुलांना घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. शिक्षकांच्या वागणुकीचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर पडत असतो. विधर्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते . ओण गोंदियातील एका शाळेत घडलेल्या प्रकारा नंतर तर ‘ गुरुजी तुम्ही सुद्धा ‘ असे बोलायची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल आठ विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून वर्गातच बॅड टच करणाऱ्या शिक्षकाच्या कृत्यामुळे खळबळ माजली आहे. शिक्षकांवर रावणवाडी पोलिसात बाललैंगिक अत्याचार अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय अग्रवाल याने वर्गातील पहिल्या बाकावर बसणाऱ्या एक दोन नव्हे तर चक्क आठ विद्याथिणींना अश्लील क्लिप दाखवण्याचा किळसवाणा आणि लज्जास्पद प्रकार केला आहे. गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या आरोपी शिक्षकाने पाचव्या वर्गातील समोरच्या टेबलवर बसणाऱ्या मुलींना अश्लील चित्रफित दाखविली. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना बॅडटच देखील केले.
यासंदर्भात मुलींनी पालकांकडे तक्रार केली. मुलींनी सांगितलेल्या या प्रकाराने पालकांना धक्का बसला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
कोल्हापूर मध्ये देखील घडला होता असा प्रकार – कोल्हापूरच्या शेळेवाडीतील विद्यालंकार शाळेत मुलींना शिक्षकानं पॉर्न फिल्मदाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या संतापानंतर आरोपी शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली. तसेच प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतरांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी दिला. शालेय मुलींना अश्लील फिल्म दाखवणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव विजयकुमार बागडी असे आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात गेल्या महिन्यात ही घटना घडली आहे. सात पीडित मुलींनी तक्रार दिल्यानंतर शिक्षकावर कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.