क्राइम
आमदार बंटी भांगडीया यांचा विनाकारण भांगडा
इस थप्पड की गुंज …… ?
काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बुटके यांच्या भावाला आणि सुनेला मारहाण
जनतेत जबरदस्त आक्रोश ; भांगडीया यांच्या वर गुन्हा दाखल
चिमूर / ज्ञानेश्वर जुमनाके
आमदार बंटी भांगडीया यांनी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांचे बंधू अश्वमेद उर्फ साईनाथ बुटके आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याला सत्तेचा माज म्हणावा की आणखी काही अश्या चर्चा जनतेत सुरू असून नागरिकांत जबरदस्त आक्रोश पसरला आहे.
उपलब्ध माहिती नुसार साईनाथ बुटके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यात कोणाचेही नाव नसतांना ती पोस्ट भांगडीया यांना झोम्बल्याने ते आपल्या काही समर्थकांना घेऊन बुटके यांच्या घरी पोहचले. त्यावेळी साईनाथ बुटके हे आपल्या शयनकक्षात आराम करीत होते.” भांगडीया यांनी कशाचीही तमा न बाळगता अश्लील शिवीगाळ करीत साईनाथ यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीला मारहाण होतांना पाहून त्यांच्या पत्नी मध्यस्थी करायला गेल्या असता भांगडीया यांनी त्यांना केस पकडत हाताला धरून फरफडत खाली आणले. बुटके पती पत्नीच्या तक्रारीवरून पोलीसस्टेशन चिमूर येथे आमदार बंटी भांगडिया यांच्या वर पोलीस स्टेशन चिमूर इथे कलम भारतीय दण्डशिता कलम 143,147,149,452,323,354,294, या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
इस थप्पड की गुंज – बंटी भांगडीया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सत्तेच्या जोरावर असे कृत्य करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनता येणाऱ्या काळात धडा शिकवेल असे बोलल्या जात आहे.
भांगडीया यांनी सायबर सेल कडे तक्रार करायला पाहिजे होती – सोशल मीडियावर आक्षेपारत पोस्ट टाकली असली तरी त्या पोस्ट मध्ये कुणाचेही नाव नाहीत जर ही पोस्ट आमदार भांगडिया यांच्या परिवाराला संबोधून केली असली तरी आमदार भांगडिया यांनी सायबर सेल ला रीतसर तक्रार साईनाथ बुटके यांच्या विरोधत द्यायला हवी होती परंतु त्यांनी असं नकरता कायदा स्वतः च्या हातात घेऊन साईनाथ बुटके यांच्या परिवाराला कार्यकर्त्यांन ना सोबत नेऊन बुटके परिवाराला मारहाण करणे उचित नव्हते मारहाण केल्या नंतर शेकडो कार्यकर्ते घेऊन पोलीस स्टेशन ला जाऊन नंरत तक्रार देणे व स्वतः कायदा व सुव्यवस्था बिगडवणे हे उचित नसल्याचे चिमूर च्या जनते मध्ये दाबक्या आवाजात बोलल्या जात आहे.
वरिष्ठांच्या पोलीस स्टेशनला भेटी – घटनेची माहिती मिळताच एसपी आणि एसडीएम यांनी चिमूर पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि ठाणेदार यांना पुढील कारवाई साठी सूचना केल्या
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
1
+1