प्रोत्साहन अनुदानापासुन शेतकरी वंचित ,शासनाप्रती शेतकरी नाराज
चिमूर प्रतीनीधी- / ज्ञानेश्वर जुमनाके
चिमुर तालुक्यातील नेरी सोसायटी अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासुन वंचित आहेत तरीही याकडे मात्र कोणाचेही अजिबात लक्ष नाही
या नेरी व परिसरातील शेतकरी ईतर कुठलाही पर्याय नसल्याने ईमाने ईतबारे शेती व्यवसाय करित आहे शेती उत्पादनातुन तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकीत असुन कौटुंबिक मेंटनंन्स सुध्दा कसा बसा करित असतो त्यात मुलांचे शिक्षणाचा खर्चही पेलवतो एवढे करुनही तो जगाचा पोशिंदा ठरला आहे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबर ज्या शेतकऱ्यांनी २०१७ पासुन सलग तिन वर्षे उचल केलेल्या कर्जाची परतफेड केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचा विचार करता महात्मा फूले कर्जमाफी योजनेतुन ५०,०००/- हजार रु.चे अनुदान देवु केले आहे
शासन निर्णय झाला अनेक शेतकऱ्यांना ५०,०००/- रु.चा अनुदान प्राप्त झाला मात्र काही शेतकरी आजही वंचित आहेत
तिसऱ्या यादीतील जवळपास २५० शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना चातक पक्षाप्रमाणे वाट पहावी लागत आहे
सन ०२२ ते ०२३ या वर्षात घेतलेली क्राफ्ट लोन ची रक्कम देण्याचा शेतकऱ्यांचा शेवटचा महीना आहे अनेक शेतकरी गरीबीत राहुन उचल केलेल्या कर्जाची परतफेड करीत असतात आणी अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना शासन हुलकावणी देत आहे
काय करावे कसे करावे पैसे कुठुन आणावे परतफेड कशी करावी अशा विविध चिंतेने शेतकरी ग्रासुन गेल्याचे दिसून येत आहे
तेव्हा शासनाने व जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेवून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/- रु.चे अनुदान अदा करुन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.अन्यथा शासन प्रोत्साहन अनुदानाप्रती उदासीन असल्याचे म्हणावे लागेल?