शेती विषयक

विधानसभेच्या धामधुमीत 85 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Spread the love

निवडणुक प्रक्रीयेत प्रशासन व्यस्त

  यवतमाळ / प्रतिनिधी
शासन, प्रशासन, राजकारणी सगळेच निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित होता़ अशात यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात तब्बल 85 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा फास जवळ केला़
ऑक्टोंबर महिन्यात आदर्श आचार संहिता लागल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षाकडून निवडणुक कामाला अधिक वेग आला़ नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात विधानसभेची धामधुम सुरू होती़ यामध्ये शासकीय अधिकारी, पुढारी, नेते, कर्मचारी गुंतले असल्याने शेतकऱ्यांकडे कुणाचेही लक्ष नव्हते़ याच कालावधीत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा फास जवळ केला़ या दोन महिन्यात तब्बल 86 शेतकऱ्यानी आत्महत्या केली़ यामध्ये सर्वाधिक ऑक्टोंबर महिन्यात 50 तर नोव्हेंबर महिन्यात 35 शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे़
आधीच यवतमाळ जिल्हा आत्महत्याप्रवण आहेत. अशात या दोन महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत़ निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळणे, अल्प उत्पन्न नैसर्गिक आपदा या त्रासाला कंटाळत अखेर शेतकरी मरण जवळ करतो़ जिल्ह्यात मागिल काही वर्षापासून सातत्याने कधी अवकाळी पाऊस, तर कधी अतिवृष्टी व कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चही निघत नाही. त्यामूळे शेती आणि शेतकरी हे चित्र गत काही वर्षांत पूर्णत: बिघडलेले दिसत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे नफ्याची मानली जाणारी शेती शेतकऱ्यांसाठी सातत्याने तोट्याचीच ठरत आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, सावकाराचे कर्ज व बँकेचे कर्ज, आजारपणा, लग्न, अन्य कारणामुळे शेतकरी आत्महत्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
दोन महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या
तालुका संख्या
कळंब 8
दारव्हा 7
बाभुळगाव 3
वणी 8
उमरखेड 6
नेर 4
झरी जामणी 5
मारेगाव 7
यवतमाळ 7
दिग्रस 6
राळेगाव 6
घाटंजी 6
महागाव 2
केळापूर 5
पुसद 3
आर्णी 2
एकुण 85
बॉक्स
लोकसभेच्या कालावधीतही 47 आत्महत्या
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता मार्च महिन्यात लागू झाली़ यात राजकीय पक्षासह, संपुर्ण प्रशासन निवडणुक कामाला लागले़ त्याच वेळी अवकाळीने कहर करत मार्च महिन्यात 26 शेतकऱ्यांनी तर एप्रिल महिन्यात 21 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली़
बॉक्स
23 वर्ष 8 महिन्यात 6042 आत्महत्या
जिल्ह्यात सन 2001 पासून शेतकरी आत्महत्येची नोंद ठेवली जात आहे. त्यानुसार 2001 ते 2006 मध्ये 777 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले़ यामध्ये 385 पात्र तर 392 अपात्र ठरल्या़ 2007 ते 2012 मध्ये 1831 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले़ यामध्ये 840 पात्र तर 901 अपात्र ठरल्या़ 2013 ते 2018 मध्ये 1741, तर 2019 ते 2021 पर्यंत 896 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ यात 375 पात्र तर 521 अपात्र ठरल्या़ 2022 मध्ये 291 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ सन 2023 मध्ये 302 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ यातील 182 शेतकरी पात्र तर 120 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या़
2 Dec 2024 ytl ph 19

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close