बाल गणेश मंडळ घाटंजी चा पुढाकार
ॲड.गजेंद्र ढवळे सरांचे जाहीर संगितमय समाज प्रबोधन कार्यक्रमातुन गणेशोत्सव साजरा.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापणेतून समाजात एकोपा रहावा व सर्व जातीपातीच्या भिंती झूगारत एकमेकांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव स्थापणा केली.याच विचाराने प्रेरित होऊन बाल गणेश मंडळ नेहरु नगर घाटंजी दरवर्षी नवनवीन सामाजिक लोकहिताचे कार्य मंडळाच्या वतीने आयोजित केले जाते.सलग तिनदा जिल्हा पातळीवर होणाऱ्या गणेश मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात या मंडळाची निवड होऊन पारितोषिकही पटकावीले. यंदाही हाच सामाजिक जनजागृती उदेश समोर ठेवत मंडळाच्या वतीने समाज प्रबोधनकार ॲड.गजेंद्र ढवळे सर व राष्ट्रनिर्माण विचार धारा संच यांचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रम रविवार 24.9.23 ला. रात्री 8 वा. आयोजित करण्यात आला आहे. प्रबोधनातून समाज सुधारणा व व्यसनापासून मुक्ती सोबतच मातापित्यांचा आदर यूवापिढी समोर निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तरी या कार्यक्रमाला गणेशभक्तांनी बहूसंख्य प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन बाल गणेश मंडळ नेहरू नगर अध्यक्ष सचिन कर्णेवार, उपाध्यक्ष ओम ढवळे तथा समस्त सदस्य गण यांचे कडून करण्यात आले आहे.