आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाला पाठिंबा
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक आर्वी येथील आदर्श एकता आर्वीसामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र किसान काँग्रेस कमिटी आयोजित शेतकरी संवाद यात्रा नंदुरबार येथून वर्धा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये दाखल झाली असता आदर्श एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. गौतम अशोकराव कुंभारे यांनी या शेतकरी हल्लाबोल आक्रोश मोर्चातील सहभागी परागजी पाष्टे, (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस) व किशोरजी वानखडे, (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस, मुख्य समन्वयक शेतकरी संवाद यात्रा ) गजेंद्र गोरे, नंदकुमार सिरसाट, मोहहंमद रफी हुसेन पठाण, संतोष खैरनार,शेतकरी आक्रोश मोर्चातील सर्व सहभागी पदाधिकारी व अखिल भारतीय किसान काँग्रेस यांचे भव्य दिव्य स्वागत केले व त्यांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समर्थन जाहीर करून आपला पाठिंबा घोषित केला.यावेळी संदीप सरोदे सचिव आदर्श एकता सामाजिक संघटना ,विनोद भाऊ कांबळे संघटक आदर्श एकता सामाजिक संघटना, विनोद सरोदे,प्रल्हाद कोडापे,दिपक दाहीया,दिलीप पवार ,सचिन थुल ,सौ.चंदा सरोदे सौ.सुलोचना कुंभारे,सौ.शुभांगी कुभांरे,सौ.पुजा कोडापे,सौ.चंदा डोंगरे,आदर्श एकता सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व स्थानिक आर्वी शहरातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.