ब्रेकिंग न्यूज

दिल्लीतही अग्नितांडव ! बेबी केअर सेमतर ला आग 7 मुलांचा मृत्यू 

Spread the love

नवीदिल्ली / नवप्रहार डेस्क 

                    दिल्लीत आगीने अग्नितांडव माजवले . एका बेबी केअर ला लागलेल्या आगीत 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच बालकांना वाचविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा  दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील विवेक विहार भागातील एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली होती.अग्निशमन विभागाच्या 16 गाड्यांनी आगीवर पुर्णतः नियंत्रण मिळविले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाल संगोपन केंद्रात मुले व कर्मचारी उपस्थित होते. अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी ते इकडे तिकडे धावू लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पूर्णपणे विझवण्यात आली आणि एकूण 12 मुलांना वाचवण्यात यश आले, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आणि इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या नवजात बालकांना पूर्व दिल्लीच्या ॲडव्हान्स एनआयसीयू रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल म्हणाले, “रात्री 11:32 वाजता अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाला रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळाली आणि एकूण 16 अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली.

आगीमुळे 2 इमारती प्रभावित झाल्या, एक रुग्णालयाची इमारत आहे आणि उजव्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीच्या 2 मजल्यांनाही आग लागली असून 11-12 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बेबी केअर सेंटर 120 यार्डच्या इमारतीत बांधण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरून 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 7 मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि 5 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती, तीही आगीच्या भक्ष्यस्थानी होती पडली. मात्र सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर पडून आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close