विशेष

5 वर्षांपासून त्या करत होत्या  डान्सबार मध्ये छमछम , सत्य समजताच पोलिसांची उडाली झोप 

Spread the love

कल्याण / नवप्रहार डेस्क 

                  त्या मागील 5 वर्षांपासून कल्याण-भिवंडी जवळच्या कोनगावमधल्या ऑर्केष्ट्रा बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्या बाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या 9 बारबालांची चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या 9 बांगलादेशी महिलांसह त्यांना खोली भाड्याने देणाऱ्या चाळ मालकावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीच्या क्राईम ब्रांचने न्यू मराठी स्कुल जवळ असलेल्या ठाकूर पाडा भागात गुरूवारी धाड टाकली, तेव्हा तिकडे 9 बांगलादेशी महिला होत्या, अशी माहिती भिवंडी क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राज माळी यांनी दिली आहे.

सीमा बेगम सिराज (वय 27), रेखा अनिसराम राम (वय 24), रुपा अनिसराम राम आका सती इक्बाल हुसैन अख्तर (वय 24), अंजनी हबीज शा (वय 23), शारदा बन्सी साहु (वय 42), ममता शारदा साहु (वय 26), पायल राजू साहु (वय 28), पिंकी शारदा साहु (वय 45) आणि काजल शांतरावन्सी साहु (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावं आहेत. याशिवाय दीपक गंगाराम ठाकरे या 45 वर्षांच्या चाळीच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. या छाप्यातून पोलिसांनी 70 हजार रुपयांचे फोन, महिलांचे पासपोर्ट आणि इतर वैयक्तिक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

दीपक ठाकरे या चाळ मालकाने कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता या बांगलादेशी महिलांना राहण्यासाठी जागा दिली होती. या महिलांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अवैधरित्या घुसखोरी केली, त्यानंतर त्या भिंवडीमध्ये मागच्या 5 वर्षांपासून राहत होत्या. याप्रकरणी कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मागच्या काही महिन्यात या भागात अनेक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचं समोर येत आहे. आतापर्यंत असे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात एकूण 24 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close