हटके

माकडांच्या भांडणात इमारतीची बाल्कनी कोसळून 5 जण ठार 

Spread the love

वृंदावन (युपी )/ नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                     मृत्यू कधी कोणाला गाठेल याचा नेम नसतो. आता उत्तरप्रदेश च्या वृंदावन येथे घडलेल्या एका घटनेत इमारतीची बाल्कनी कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दाबून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात शिव मंदिरावर दरड कोसळून घडलेल्या अपघातात 30 लोकांचा मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच वृंदावन येथे बाल्कनी कोसळण्याची घटना घडली आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मंदिराजवळच्या जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली. बाल्कनीचा ढिगारा अंगावर पडल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांमध्येगीता कश्यप (कानपूर), अरविंद कुमार (कानपूर नगर), रश्मी गुप्ता (कानपूर),अंजू मुगी (वृंदावन) आणि एका अज्ञाताचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूबागेतील जुन्या इमारतीची जीर्ण बाल्कनी अचानक कोसळली. रस्त्यावरुन जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर ही बाल्कनी कोसळल्याने या दुर्घटनेमध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. माकडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात इमारतीची बाल्कनी पडली असल्याचे सांगितले जात आह

बांके बिहारी मंदिराजवळ डोसायत परिसरात विष्णू शर्मा यांची जुनी इमारत आहे. या इमारतीची बाल्कनी जीर्ण झाली होती. या बाल्कनीमध्ये माकडांच्या दोन गटामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे बाल्कनी कोसळली. ही बाल्कनी रस्त्यावरुन जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर पडली. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली काही भाविक अडकले गेले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close