सामाजिक

निघोजकरांचे ऋण मी कधी विसरणार नाही , खा . डॉ . निलेश लंके .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील याकडून ] – हंगा ही माझी मायभूमी असून निघोज ही माझी कर्मभूमी आहे . या निघोजकरांनीच मला आमदार करण्यास व आता खासदार करण्यास खूप मोठा वाटा असल्याने मी यांचे ऋण या जन्मातही फेडू शकत नाही , असे प्रतिपादन अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉ . निलेश लंके यांनी केले आहे .
अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉ . निलेश लंके यांचा भव्य सन्मान दिवंगत बाबासाहेब कवाद संस्थापित निघोज ग्रामीण संस्था परिवाराच्या वतीने बाबासाहेब कवाद निघोज नागरी संस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद सर , पारनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने हंगा येथे करण्यात आला . या सन्मानाने खा . डॉ . निलेश लंके भारावून गेले , यावेळी ते पुढे म्हणाले की , मी आमदार होण्यास खऱ्या अर्थाने निघोजकरांचे योगदान असून आता खासदार होण्यासही यांचेच योगदान आहे . त्यामुळे निघोजकरांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही . आमदारकीच्या साडे चार वर्षाच्या कालखंडात मी निघोज परिसरात ८० कोटी रुपयांची विकास कामे केली असून येथून पुढील काळातही विकास कामांना झुकते माप दिले जाणार आहे , असे ही खा . डॉ . निलेश लंके म्हणाले .
यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद यांनी खा . डॉ . लंके यांच्या काम करण्याची पद्धत व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम अतिशय नियोजन बद्द असल्याने त्यांचा असाच राजकीय आलेख उंचावत राहिन . तर माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की , खा . डॉ . लंके यांचा अहिल्यानगर दक्षिण मतदार संघाचा असणारा अभ्यास , विकास कामासंदर्भात असणारी दुरदृष्टी , साधे राहणीमान व उच्च विचारसरणी , यामुळे त्यांना मतदार संघातील सर्वच सर्वच तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळाले .
या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी बाबासाहेब कवाद नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नामदेव थोरात , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अमृता रसाळ , तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे , श्री मळगंगा ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद , सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन शांताराम लाळगे , माजी व्हाईस चेअरमन वसंतराव ढवण , संचालक शांताराम कवाद , देवस्थान ट्रस्टचे सहसचिव विश्वास शेटे , विश्वस्त बाळासाहेब लंके , आपली माती , आपली माणसं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश ढवण , ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे , शंकरराव गुंड , गणेश कवाद , सतिष साळवे , माजी उपसरपंच भिवा रसाळ , रामदास लामखडे , अंकुश लोखंडे , दत्तात्रय लंके , गोविंद लामखडे , भाऊ रसाळ , श्रीकांत लामखडे , निलेश लामखडे , सचिन लंके , प्रगतशील शेतकरी दिलीप लाळगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते .
या प्रसंगी खा . डॉ . निलेश लंके यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती . तरी देखील त्यांनी व्यस्ततेतून वेळ काढत , सर्वांशी संवाद साधत , आपुलकीने विचारपूस करत , सन्मान स्विकारला व विविध विकास कामांबाबत चर्चा विनिमय केला , एकीकडे चर्चा , दुसरीकडे अधिकाऱ्यांना दुरध्वनी वरून सूचना , हसत हसत सन्मान स्विकारत , प्रत्येकाला वेळ देत होते , हेच त्यांच्या राजकीय यशाची गणित आहे , हेच कोडे भल्या भल्याने सुटले नाही .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close