स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या ‘एक तारीख एक तास’ उपक्रमांतर्गत
समता मैदानावर सामुदायिक स्वच्छता अभियान
यवतमाळ /अरविंद वानखडे
स्वच्छता सेवा पंधरवाडा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त देशभरात १२५७९ ठिकाणी एकाचवेळी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येत असुन यवतमाळ नगर पालिकेच्या वतीने स्थानिक समता मैदान येथे मा. पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री म.रा.यांच्या उपस्थितीत व मा.आ. मदनभाऊ येरावार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात मा. खा. भावनाताई गवळी यांची व मा. जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब, व मा. डॉ. पवनकुमार बन्सोड जिल्हा पोलिस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१ ऑक्टोंबर रोजी सकाळी समता मैदानावर सकाळी १० वाजता आयोजित या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत पालिकेचे सर्व अधिकारी,कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी व स्वच्छता मित्र यांच्या समवेत शहरातील निमंत्रित सेवाभावी व शैक्षणिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते महिला बचतगट सदस्य, क्रिडापटु, पत्रकार बांधवांच्या सहभागातून हे सामुदायिक स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.