केंद्राच्या आणखी एका महत्त्वाच्या समितीवर खा.डॉ.अनिलजी बोंडे यांची नियुक्ती
ल
अमरावती : राज्यसभा सदस्य म्हणून डॉ.अनिल बोंडे हे निवडून आल्यानंतर त्यांच्या कामाचा सपाटा वेगवान पद्धतीने सुरू झाला आहे. केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर यापूर्वीच त्यांची निवड झालेली असताना पुन्हा एकदा आणखी एका महत्त्वाच्या समितीवर त्यांची नियुक्ती संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील खासदारांच्या नेतृत्व म्हणून डॉ. अनिल बोंडे यांना प्रतोदपदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर डॉ.अनिल बोंडे यांनी देश व महाराष्ट्र हिताचे विविध प्रश्न राज्यसभेत उपस्थित केले. त्यावर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून गतीने कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. अभ्यासू व्यक्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये सुप्रिचित असलेल्या डॉ.अनिल बोंडे यांच्या अनुभवाचा केंद्र सरकारला फायदा व्हावा यासाठी संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने विधी व न्याय मंत्रालयाच्या हिंदी सलाहकार समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.योगेश खासबागे ,
अध्यक्ष भाजप वरून शहर , निलेश बेलसरे ,जिल्हा उपाध्यक्ष वरुड शहर , दुर्गादास शेगेकर , किरण सावरकर , जीवन मालपे , मुरलीधर पवार, गौरव भेलकर ,रणवीर सिंग , निखिल कोडस्कर , मनोज आजनकर यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.