२३ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन आयोजित
हिवरखेड ( मोर्शी )/ जितेंद्र फुटाणे
महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय हिवरखेड ता. मोर्शी दिनांक २७/१०/२०२४ रोज रविवारी वऱ्हाड विकास अमरावती व सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन आयोजन सभा मा. श्री. साहेबरावजी पाटील ,अध्यक्ष सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली. यावेळी मा .श्री प्रा.श्रीकृष्ण बनसोड,संपादक वऱ्हाड विकास अमरावती ,सर्वोदय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष मा .श्री वसंतरावजी तडस,सचिव मा .श्री प्रकशभाऊ भोजने,संस्थेचे संचालक मा श्री. म. छ. शर्मा , मा. श्री. रमेशभाऊ भोजने, मा . श्री. पांडूरंगजी पाटील, मा. श्री वामनरावजी भडके, मा श्री रविंद्राभाऊ वासनकर, महात्मा फुले हायस्कूल च्या प्राचार्या हे श्रीमती सुनंदा दातीर, मा .श्री नारायणरावजी मेंढे मा. श्री .अरविंदभाऊ ना. आमले व वार्ताहर मा. श्री. जितेंद्र ना.फुटाणे उपस्थित होते.