सामाजिक

धारवाडी व गंभिरवाडी त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – मुंबई येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पारिजात संस्थेच्या सुगंध जगण्यातला यांच्या विद्यमाने ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा,धारवाडी(तिरडे) व गंभिरवाडी(तिरडे) येथील विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरडे गावचे सरपंच विठ्ठल पुनाजी गोडे व प्रमुख अतिथी संतोष नरसाळे सर हे होते. सुत्रसंचालन मच्छिंद्र बांबळे सर यांनी केले.गंभिरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा शेटे यांनी पारिजात संस्था व संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती चंदर गोडे,सदस्य उमेश लहू जाधव,ग्रामपंचायत सदस्य उत्तम म्हसू गोडे,शिक्षक पालक संघाचे सदस्य खुशाल मधुकर गोडे,गंभिरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कार्तिक कुंडलिक जाधव, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. धारवाडी(तिरडे) शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ भास्कर हंबर्डे सर यांनी पारिजात संस्था व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ च्या स्वरूपात केळी देण्यात आली. शालेय साहित्य व खाऊ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ ,समशेरपूर बीटचे विस्तार अधिकारी गोवर्धन ठुबे ,पाडोशी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल नरसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.परिसरातील पालक व ग्रामस्थ या उपक्रमाचे कौतुक केले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close