कापूस जाळून वंचित बहुजन आघाडीने नोंदविला निषेध
यवतमाळ / प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व तालुका स्तरावर दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज यवतमाळ तहसील कार्यालय येथे धरणे
आंदोलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी आपल्या वक्तव्यातून पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी बांधवांनी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला केंद्र सरकारने दडपशाहीच्या धोरणाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचे प्रयत्न करीत आहे. आंदोलक शेतकरी दिल्लीत पोहोचू नये म्हणून त्यांची जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे, त्यांच्या मार्गावर खिळ्याचे पत्रे ठोकण्यात आले आहेत. सशस्त्र सेना त्यांना रोखण्याकरता उभी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मोठमोठी कंटेनर वाहनं त्यांच्या रस्त्यावर आडवी करण्यात आलेली आहेत. रबरी गोळ्यांचा गोळीबार करण्यात येऊन शेतकऱ्यांना दहशतवाद्यासारखी वागणूक देण्यात येत आहे. या सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखा या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवून धरणे देत आहेत. इतर राजकीय पक्ष उमेदवारी जागावाटप व उमेदवारी जाहीर करण्यात मश्गुल असताना वंचित बहुजन आघाडी हा बहुजनांचा पक्ष शेतकरी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून न्यायाची लढाई लढत आहे असे विचार व्यक्त केले.
आज सुट्टीचा दिवस असताना विद्यमान तहसीलदार यवतमाळ यांनी धरणे मंडपात स्वतः येऊन निवेदन स्वीकारले. तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन संपन्न झाले. या आंदोलनासाठी जिल्हा अध्यक्ष डॉ निरज वाघमारे, जिल्हा महासचिव शिवदासजी कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, युवा अध्यक्ष आकाश वाणी जिल्हा, महिला महासचिव पुष्पा सिरसाट सरला चचाने, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले, कोषाध्यक्ष अरुण कपिले, उपाध्यक्ष मीना रणीत, संध्या काळे, वांदना सचिव भारती सावते, शोभना कोटंबे, सुकेशिनी खोब्रागडे, करुणाताई मुन, शहर महासचिव रत्नमाला कांबळे, शहराध्यक्ष कुंदन नगराळे,उपाध्यक्ष विवेक वाघमारे, संतोष राऊत ,आनंद भगत, शैलेश भानवे , तालुका उपाध्यक्ष संतोष नगराळे,उपाध्यक्ष राहुल भगत, सचिव आशिष वाघमारे,माजी जिल्हाध्यक्ष, राजेंद्र तलवारे, धनंजय गायकवाड, खंडेश्वर कांबळे., आनंद भगत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.विलास नंद पटके अमित शंभरकर विकास गोटे अमोल वाघमारे, मयूर मिसाळ सुनील ढोरे चंदन वानखेडे,, राहुल वानखडे, सेवक गेडाम,संजोग बहादे राजू भगत विकास मेंडे विजय भगतइत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.