क्राइम

19 वर्षाच्या धर्मांध तरुणाकडून 11 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

Spread the love

 

धर्म परिवर्तनासाठी दबाब, नमाज आणि कलमा वाचायला लावला

व्हिडिओ बनवून पैशे उकळले, मित्रांना व्हिडिओ पाठवले

वकिलांनी न्यायालयातच तिला आरोपीला चोप

भोपाळ /विशेष प्रतिनिधी

मागील काही काळापासून नाव बदलून हिंदू मुलींना आपल्या प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाब टाकण्यात येत असल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. भोपाळ येथील 11व्या वर्गात शिकणाऱ्या तरुणीला ओळखीच्या मुलीच्या माध्यमातून प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ बनवून मुली कडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सबंधित तरुणाला न्यायालयात आणले असता तेथील वकिलांनी आरोपीला चोप दिला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, भोपाळच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडला. येथे एका सामान्य न्यायालयीन सुनावणीचं रूपांतर हाणामारीत झालं. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, वकिलांनी त्यांच्याशीही वाद घातला.

भोपाळमधील एका अल्पवयीन मुलीविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या आरोपी ओसाफ अली खानला मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. एक सामान्य रिमांड सुनावणी अपेक्षित असताना, संतप्त वकिलांच्या एका गटाने पोलीस पथक आणि हातकड्या घातलेल्या आरोपीला घेरले आणि दिवसाढवळ्या त्याला मारहाण केली, ज्यामुळे परिस्थितीने हिंसक वळण घेतले मारहाण करत पीडित मुलीसाठी न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकारी हस्तक्षेप करण्यासाठी धावले, ज्यामुळे वकील आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादाचा आणि हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या मुलीशी तिच्या एका मैत्रिणीमार्फत मैत्री केली प्रेम व लग्नाची आश्वासनं देऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. गेल्या वर्षी जुलैमध्ये, तो तिला खानुगाव येथील एका निर्जन ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन गेला, जिथे त्याने गाडीत तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेचा एक अश्लील व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केला.

पण तो भयानक अनुभव तिथेच संपला नाही. खानने त्या घाबरलेल्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केलं. तिच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली आणि तिने पैसे न दिल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने त्याला 40 हजार रुपये कसेबसे दिले. जेव्हा तिने त्याला ब्लॉक करून संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने तो अश्लील व्हिडिओ तिच्या मित्रांना दाखवला आणि तिच्यावर धर्मपरिवर्तन करण्यासाठी मानसिक दबाव आणला. इतकंच नाही तर तिच्या इच्छेविरुद्ध तिला कलमा म्हणायला आणि नमाज पढायला भाग पाडले.

खचलेल्या त्या अल्पवयीन मुलीने अखेरीस आपल्या कुटुंबाला सर्व काही सांगितले. हिंदू संघटनांच्या सदस्यांच्या पाठिंब्याने, तिने कोहेफिजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पॉक्सो कायद्याच्या कठोर कलमांसह, बलात्कार, खंडणी, ब्लॅकमेल आणि संबंधित गुन्ह्यांच्या कलमांखाली तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आला.

कोहेफिझा पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर कृष्ण गोपाल शुक्ला यांनी दुजोरा दिला की, “तक्रार दाखल होताच आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्याचा मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सखोल चौकशीसाठी आम्ही त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेतले आहे. तपास सुरू आहे आणि समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close