क्राइम

१ लाखाची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक एसीबी च्या जाळ्यात 

Spread the love

गोवंडी / नवप्रहार ब्युरो 

                    शाळेत अधिकृत रित्या प्रवेश थांबवण्यासाठी आणि शाळा व्यवस्थापनाला संरक्षण प्रदान करण्यासाठी शाळा ट्रस्टी कडून १लाख रुपयांची लाच मागणे वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला चांगलेच भोवले आहे. एसीबी ने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. 

१५ ऑगस्ट २०२४ रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. यासंदर्भात शाळेच्या ट्रस्टीनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती.

या प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती.या बाबत ट्रस्टीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

मंगळवारी रात्री यातील १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याना रंगेहात पकडले असून पुढील कारवाई लाचलुचपत विभाग करीत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close