क्राइम
श्रध्दा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

प्रियकरा ने प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे 31 तुकडे करून जमिनीत पुरले
भुवनेश्वर / नवप्रहार मीडिया
लव्ह आणि धोका आता यागोष्टी सर्रास घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्म वरून तरुणीला एखाद्या व्यक्ती सोबत प्रेम होते. समोरचा तरुण किंवा व्यक्ती तरुणी किंवा महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याचे नाटक करतो. तो तिच्या शरीराचा यथेच्छ उपभोग घेतो. आणि तरुणी किंवा महीले कडून लग्नाची मागणी घातल्या गेल्यास तिची हत्या करण्यात येते.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि अन्य प्रकरण याच धर्तीवर असतात. आता ज्या प्रकरणाबद्दल आम्ही आपणाला सांगणार आहोत त्यात तरुणीला ज्या व्यक्ती सोबत प्रेम झाले तो लग्न झालेला आणि पाच मुलांचा बाप होता. तरुणी त्याच्या घरी जाऊन त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकत होती. त्यामुळे तरुणीची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी तिच्या शरीराचे 31 तुकडे करून ते जमिनीत पुरले होते. या हत्याकांडात प्रियकराच्या पत्नीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हे प्रकरण ओडिसातील नबरंगपूर जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत आदिवासी मुलीचं वय अवघं 22 वर्षे होतं. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची मुलगी बुधवारी घरातून निघाली होती. बराच वेळ मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना तिची काळजी वाटू लागली. त्यानंतर गावकऱ्यांसह कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा पत्ता लागला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
दुसरीकडे रायघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आदित्य सेन यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यानंतर बरंगपूर जिल्ह्यातील जंगलातून महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचा मृत्यू किती वेदनादायी होता, याचा अंदाज तिच्या शरीराच्या लहान-लहान तुकड्यांवरूनच लावता येईल. मृतदेहाचे 31 तुकडे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ते जमिनीखाली पुरण्यात आले होते. पोलीस तपासादरम्यान मृतदेहाचे तुकडे सापडले
याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पाच मुलंही असल्याचं सांगण्यात येत आहे. पती-पत्नीने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुलगी तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती आणि त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यानंतर प्रियकराने पत्नीसह मिळून तरुणीची हत्या केली.
सध्या पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत, तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून हत्येचं गूढ उकलण्यात पोलीस व्यस्त आहेत. या घटनेनं मुलीच्या कुटुंबात खळबळ उडाली. गावातील लोकांनाही या घटनेमुळे धक्का बसला आहे. दुसरीकडे, या घटनेनं पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ज्यामध्ये श्रद्धाच्या प्रियकराने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते .