हटके

धक्कादायक …… बांगलादेशी HIV बॉम्ब मुळे अनेक मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात 

Spread the love
 
मुंबई /विशेष प्रतिनिधी 
          मुंबई करांसाठी धोक्याची घंटा देणारी बातमी समोर येत आहे. येथे बांगलादेश येथून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या महिलांपैकी 7 महिलांना HIV ची लागण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक मुंबईकरांचा जीव धोक्यात आल्याची चर्चा रंगत आहे. 
 
           पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार परिमंडळ 11 च्या चमू ने धाड टाकत देहव्यावसायात लिप्त असलेल्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश केला होता. या महिलांना अटक केल्यानंतर यांच्या आरोग्याची तपासणी केल्यावर 14बांगलादेशी महिलांपैकी 7 महिलाना HIV ची लागण असल्याचे समोर आले आहे. 
 
40 ते 50 हजार रुपये मासिक पगारावर काम करत होत्या महिला – – सूत्रांकडून  मिळालेल्या माहिती नुसार या महिलाना बांगलादेश येथून नोकरीचे आमिष देत आणले गेले होते. त्यांच्या कडून देहविक्रय करून घेणारी मंडळी त्यांना प्रति महिना 40. ते 50 हजार रु.पगार देत होती. सध्या या महिलांची रवानगी शासकीय सुधारगृहात करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या महिलांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना बाधा झाल्याची शक्यता – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या महिलांच्या संपर्कात जे कोणी आले असेल त्यांच्या पैकी काहींना HIV ची बाधा झाली असावी अशी शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close