हटके

त्याने  रिल च्या नादात चक्क कोब्राला तोंडात पकडले अन्…..

Spread the love

कामारेड्डी (तेलगणा) / नवप्रहार डेस्क

             तरुणाईला सध्या रीलस् आणि व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करत फोलॉवर्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास तत्पर दिसत आहे. रीलस बनवून सोशल मीडियावर टाकण्याच्या नादात एका तरुणाने चक्क कोब्रा सापाचे तोंड आपल्या तोंडात टाकले अन् …..

व्हिडिओ तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील असल्याचं कळत आहे. सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरंतर व्हिडिओ अविश्वसनीय असाच आहे. लोक सापाला पाहिलं तरी त्याच्यापासून दूर पळतात. पण, हा २० वर्षाचा मुलगा थेट सापाचे तोंड आपल्या तोंडात ठेवून खतरनाक स्टंट करत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचे नाव शिवराज होते. व्हिडिओमध्ये शिवराज हात जोडून उभा आहे अन् त्याच्यामध्ये तोंडामध्ये एक भला मोठा साप आहे. अंगावर काटा आणणारा हा प्रचंग आह

शिवराजच्या बाजूलाच एक दुसरा मुलगा दिसत आहे. तो व्हिडिओ शूट करत आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. तो व्यक्ती कॅमेऱ्यात दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध उभा राहून शिवराज हा स्टंट करत आहे. त्याच्या तोंडात कोब्रा साप असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिवराज स्टाईल मारताना देखील दिसत आहे. तो आपले केस मागे घेऊन आपण ‘हिरो’ असल्याचं सूचवतो.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टंट दरम्यान काही वेळानंतर हाच साप शिवराजला चावला आहे. त्यानंतर काही तासांनी त्याचा मृत्यू झालाय. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी किंवा काही फॉलोवर्स मिळवण्यासाठी तरुण आपला जीव कसा धोक्यात घालत आहेत याचं हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे स्टंट करणे हे धोकादायक असते. त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे स्टंट न करण्याच आवाहन प्रशासन करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close