ब्रेकिंग न्यूज

 उर्मिला कोठेकार च्या कार ने मजुरांना चिरडले ; एकाचा मृत्यू , एक गंभीर

Spread the love
कार चा चक्काचूर , उर्मिला आणि चालक जखमी 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

                        अभिनेत्री उर्मिला कोठेकार हिच्या कार ने दोन मजुरांना चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक मजूर गंभीर जखमी आहे. कोठेकार हिच्या कार चा चक्काचूर झाला असून ती स्वतः आणि वाहन चालक जखमी झाला आहे.

शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. असं असलं तरीही तिच्या कारचा मात्र चक्काचुर झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झालाय.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. उर्मिलाही या अपघातात जखमी झालीये. पण एका मजूराचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे. तसेच आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून उर्मिलाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण आता या अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close