ब्रेकिंग न्यूज

आईचा विरह सहन न झाल्याने उच्छाशिक्षित बहिण – भावाची आत्महत्या

Spread the love
दोघांनी पायाला दोरी बांधून राजाराम तलावात केली आत्महत्या
घरातील साहित्य गरजूंना केले दान 
कोल्हापूर  / नवप्रहार डेस्क 
                 आईचा विरह सहन न झाल्याने मानसिक धक्क्यात असलेल्या बहिण – भावाने राजाराम तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोघांचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने घटनेचा उलगडा झाला.  भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) व अॅड. भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (५७, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून आईचा विरह सहन न झाल्याचे कारण समोर आले. या दोघा उच्चशिक्षितांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नाळे कॉलनीत राहणारे भूषण कुलकर्णी कस्टम अधिकारी म्हणून तीन  वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. भाग्यश्री यांनी यापूर्वी गोखले महाविद्यालय व राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. त्या सात वर्षांपासून वकिली करीत होत्या. दोघेही त्यांची आई पद्मजा कुलकर्णी यांची सेवा करीत होते. आईच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचाही विचार केला नव्हता, असे नातेवाईक सांगत होते.
संस्कृत धर्मकोशासाठी २५ लाखांची देणगी….
पद्मजा कुलकर्णी यांनीही इतिहास विषयातून एम. ए. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्होकल म्युझिकमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. पाककला, संस्कृत, ज्योतिषशास्त्रात त्यांना रुची होती. संस्कृतमध्ये त्यांची ही आवड लक्षात असल्याने वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या “धर्मकोश” प्रकल्पाला मदत देण्याची इच्छा त्यांनी मुलांजवळ व्यक्त केली होती. पद्मजा कुलकर्णी यांच्या निधनानंतर भूषण व भाग्यश्री कुलकर्णी यांनी नुकतीच २५ लाखांची देणगी या पदाधिकाऱ्यांनी देऊ केली होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close