राज्य

 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा मुद्दा लवकर निकाली काढा – सर्वोच्च न्यायालय

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

              तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा लवकर निकाली काढा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्षांना कोणतेही संवैधानिक संरक्षण नाहीयेअसे खडेबोल देखील न्यायालयाने सुनावले आहे.

आम्ही आधीच स्पष्ट केलेले आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयानेआमदार अपात्रता प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढण्याचे निर्देश दिले.

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांचे अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर प्रलंबित आहे. आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. बीआरएसचे आमदार कौशिक रेड्डी यांनी या प्रकरणी याचिका दाखल केलेली आहे.

पुढच्या आठवड्यापर्यंत प्रकरण निकाली काढा

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी सुनावणी झाली. सरन्यायाधीश गवई म्हणाले, “हे प्रकरण पुढील आठवड्यापर्यंत निकाली काढा, नाहीतर न्यायालयाच अवमान केल्याचा सामना करण्यासाठी तयार रहा. हा निर्णय त्यांना द्यायचा आहे. आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, अशा प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना कोणतेही घटनात्मक संरक्षण नाहीये.”

“नवी वर्ष हे प्रकरण निकाली काढून साजरं करायची की, न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणाला सामोरं जायचं आहे. हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवावं. विधानसभा अध्यक्षांचे हे वर्तन सर्वोच्च न्यायालयाचा घोर अवमानाच्या श्रेणीतच येते”, अशा शब्दात सर्वोच न्यायालयाने सुनावले.

भारत राष्ट्र समितीच्या १० आमदारांनी पक्षांतर करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडून आलेल्या आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रता कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पण, हे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. ३१ जुलै रोजी आदेश दिल्यानंतरही आतापर्यंत निकाल क दिला गेला नाही?, असा प्रश्न न्यायालयाने अध्यक्षांना विचारला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close