क्राइम

पाच मित्रांना घरी बोलवून पत्नीवर केला सामूहिक अत्याचार , पेट्रोल टाकून जिवंत जाळले

Spread the love
 

लखनौ (उत्तर प्रदेश) / नवप्रहार डेस्क

             ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. तो इतका निर्दयी बनेल याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एका पतीने आपल्या 5 मित्रांना घरी बोलावून त्यांच्या सोबत दारू पिऊन पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. आणि इतक्यावरच तो शांत झाला नाही तर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. सदर घटना रायबरेलीमध्ये घडली आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंह याचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका युवतीसोबत झाला होता. जितू सिंहने शनिवारी आपल्या पाच मित्रांना घरी बोलावले होते. प्रथम त्यांनी एकत्र बसून दारू प्यायली, त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

जितू सिंहने पत्नीवर आपल्याच पाच साथीदारांनी सामूहिक बलात्कार करायला सांगितल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीओ महाराजगंज यदुराम पाल यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी जितू हा चुरवा येथील रहिवासी असून त्याने उत्तराखंडमधील एका मुलीशी लग्न केले होते. पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून जितूला अटक करण्यात आली आहे. इतर दोषींवर कारवाई केली जाईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close