सामाजिक

अपंगाच्या ५ % निधी वाटपवरुन पंगडीत प्रहार कार्यकर्त्यानी ग्रामसभा गाजवली

Spread the love

 

शासन योजना नूसार मिळणारा आतापर्यंतचा अपंगाचा ५% निधी वाटप झालाचं नाही! २२ लाभार्थि त्यापासून वंचित.*

घाटंजी ता. प्रतिनिधि-सचिन कर्णेवार

दि. २०/२/२४ रोजी प्ररहार जनशक्ती पक्ष व गावातील नागरिक यांनी अपंगाचे प्रश्न घेत पंगडी ग्रामसभा गाजवली.घाटंजी तालुक्यातील पंगडी या गांवी २२ दिव्यांग बांधव आहे. या ग्रामपंचायत ला ५% टक्के निधी हे महाराष्ट्र सरकार प्रत्येंक स्वराज्य संस्थेत जसे ग्रामपंचायत ,नगरपरिषद,जिल्हा परिषद ला वाटप करण्यात येत असते तो आला परंतु ही मोहीम सरकारने हातात घेतली तेव्हा पासून तर आजपर्यंत ५% निधी या ग्रामपंचायतला अपंगास वाटप करण्यात आला नाही. हा मुद्दा उपस्थित करत पंगडी ग्राभमसभेत ग्रामसेविकेस प्रहार कार्यकर्ते व गावक-यांनी धारेवर धरले. एकीकडे दिव्यांगच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आले परंतु आयदी व बेजवाबदार ग्रामसेवकांनच्या धोरणामुळे गेल्या कित्येक वर्षापासुन दिव्यांगाला कुठलाही निधी मिळाला नाही. आज दि.२० फेब्रुवारी पंगडी ग्रामपंचायत आमसभेत प्रहारचे उप ता.प्रमुख गौरव काकडे तथा कार्येकर्तां अजय गांदेवार ,नयन भोयर,भाऊ सोळंके,व ईतरही कार्यकर्ते गावकरी यांनी अपंगाचा प्रश्न व ५% निधीचा प्रश्न घेऊन आमसभा गाजवली. ग्रामसभेस अपंगाचा निधी प्राप्त झाला असून आज पर्यंत निधी का दिला नाही ? अपंगाचा वाटला जाणारा निधी किती ? यांची पोलखोल केली.प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते व गावातील सुज्ञ नागरिक यांच्या सतर्कतेमुळे १३ लक्ष रूपये एवढा निधी अपंगाच्या नावाने जमा असल्याचे सभेत उघड झाले व पुढील काही दिवसातच तो निधी अपंग बांधवास वाटप करण्यात येईल अशी ग्वाही देखिल देण्यात आली. अशिच परिस्थिति ईतरही ग्रामपंचायत मधे असेल हे नाकारता येत नसल्याचे ही या प्रकरणामूळे उघड़ होते.
ooooooooooooo

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close