महायुती ला मिळणार ईतक्या जागा
मुंबई / नवप्रहार डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग पकडला आहे. प्रत्त्येक पक्षाचे नेते सभा गाजवीत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यां नीवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवते आहे ती म्हणजे कोणीच ठाम पणे सांगू शकत नाही की कोणाला किती जागा जिंकता येतील . पण भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुती कित्ती जागा जिंकेल यावर भाष्य केले आहे. काय आहे त्यांचा अंदाज
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले. निकाल कसा लागू शकतो, कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याबद्दलही अंदाज व्यक्त केला.
महायुती किती जागा जिंकेल? विनोद तावडे म्हणाले…
महायुती आणि महायुतीतील पक्षांना किती जागा मिळतील? असा प्रश्न विनोद तावडे यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, “अजून प्रचाराचे दिवस आहेत. कालच (८ नोव्हेंबर) मोदी, अमित भाईंचे प्रचार दौरे सुरू झालेत. आज (९ नोव्हेंबर) असं मानतो की, १५५ ते १६० जागांपर्यंत महायुती जाईल. आणि उरलेल्या जागांमध्ये महाविकास आघाडी असेल, अशी आजची स्थिती मी बघतोय.”
भाजप १४८ पैकी किती जागा जिंकू शकतो?
याच प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे पुढे म्हणाले की, “भाजपला ९० ते १०० दरम्यान जागा असतील. चांगला स्ट्राईक रेट राखला जाईल. एकनाथ शिंदेंना ४० पर्यंत… ते अंदाज करत आहेत. आणि अजित पवारांना २० ते २५ जागा मिळतील. आज अजून प्रचारानंतर त्यांच्या जागा वाढू शकतात”, असा अंदाज विनोद तावडे यांनी मांडला.
महाविकास आघाडीबद्दल अंदाज काय?
महाविकास आघाडीमध्ये कोणाचा स्ट्राईक रेट जास्त राहील असं वाटतं? तावडे म्हणाले, “काँग्रेसचा. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यानंतर उबाठा”, असा अंदाज तावडे यांनी व्यक्त केला.