अजब गजब

 उत्तरप्रदेश मध्ये ड्रॅक्युला गँग ? , जबरदस्तीने लहान मुलांचे काढतात रक्त

Spread the love
 
देवरिया (युपी) / विशेष प्रतिनिधी 
                 युपी च्या देवरिया जिल्ह्यात ड्रॅक्युला गँग सक्रिय झाली असून ती लहान मुलांचे जबरदस्तीने रक्त काढत असल्याचे लहान मुले सांगत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांनी पोलिसांना देखील असेच सांगितले आहे.
स्थानिक लोकांनी सांगितलं की, देवरिया कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील उमा नगर कॉलनीत ड्रॅक्युला गँग फिरत आहे. ही टोळी गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांना धमकावते. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे मागते. तर त्यांनी पैसे दिले नाहीत तर बंदुकीच्या धाकावर रक्तपेढीत घेऊन जाऊ त्या मुलांचं जबरदस्ती रक्त काढून घेते, असा आरोप लहान मुलांनी आणि पालकांनी केला आहे.
पीडित मुलांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांचे कुटुंबिय हादरले. पालकांनी असा आरोप केला आहे, ड्रॅक्युला गँग हे रक्तनंतर विकतात. पोलिसांनी सांगितलं की, या परिसरातील अनेक पालकांकडे मुलांनी ड्रॅक्युला गँगकडून झालेल्या अत्याचाराची धक्कादायक कहाणी सांगितली आहे. त्यानंतर सर्व पालक एकत्र येऊन त्यांनी देवरियाचे पोलीस अधिक्षक संजीव सुमन यांना संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी पालक आणि मुलांची तक्रार नोंदवून घेतली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचे गाभीर्य लक्षात घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून एक पोलिसांचे पथक तपास करत आहेत. पोलीस परिसरातील अनेक संशयितांना ताब्यात घेऊन तपास करण्यात येत आहे. जोपर्यंत ही गँग पकडली जात नाही परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पालकांना मुलांना घराबाहेर पाठवायला भीती वाटत आहे, तर त्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावतेय. आरोपी पकडल्या गेल्यावर त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पालकांनी केली आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close