क्राइम

युवासेना शहर प्रमुखाची भोसकून हत्या 

Spread the love
चंद्रपूर / प्रतिनिधी.
 
             एकिकडे पोलीस प्रशासन प्रजासत्ताक दिनामुळे हायअलर्ट वर असतांना शहरातील सरकार नगर मध्ये उबाठा गटाचे युवा सेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेचे गाभिर्य लक्षात घेता  एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला आणि  एका माजी पदाधिकाऱ्याला  अटक केली आहे.  पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 

      शिवा वझरकर असे त्या शहर प्रमुखाचे नाव आहे. घटनेनंतर वझरकर यांच्या समर्थकांनीं  आरोपीच्या वाहनांची तोडफोड केली आहे.  हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर उबाठा शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close