क्राइम

ओयो हॉटेल मध्ये तरुणीची हत्या

Spread the love

पूणे / प्रतिनिधी 

               पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरात एका ओयो हॉटेल मध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणीची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास केला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेतलं आहे. घटनेमागे प्रेम प्रकरणाचं कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे.

साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची ओयो हाँटेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात होता. पण मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत अटक केली. गुन्ह्यासाठी वापरले गेलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे.

शरद मोहोळ प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपींवर मोक्का
गुंड शरद मोहोळ खून प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १५ जणांना अटक करण्यात आलीय. शरद मोहोळची साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर १२ तासांच्या आत हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुख्य सूत्रधारासह इतरांना अटक केली होती.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे याच्यासह सतरा जणांवर गुन्हे शाखेने मोक्का कारवाई केलीय. आत्तापर्यंत या प्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close