ब्रेकिंग न्यूज

शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे युवकाचा अपघात  

Spread the love
रनिंग करत असलेल्या युवकाला।दुचाकीची धडक ; गंभीर जखमी 
चांदुर रेल्वे / अमोल ठाकरे 
            शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेचा परिणाम युवकाच्या जिवावावर बेतला असून  पोलीस भरती साठी रनिंग करीत असलेल्या युवकाचा अपघात झाल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागत आहे.
                मागील काही दिवसांपासून तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे. या क्रीडांगणाच्या मैदानावर शहर आणि तालुक्यातील अनेक तरुण तरुणी पोलीस भरती आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करीत असतात. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या परतीच्या पावसाने या क्रीडांगणाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या मैदानाला अक्षरशः तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुण तरुणींना रस्त्याने रनिंग करावी लागत आहे.
रनिंग करीत असताना घडला अपघात – तालुक्यातील जावरा येथील तरुण राम गावंडे हा तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहे. आज सकाळी तो विरुळ रस्त्याने रनिंग करीत असताना मागून आलेल्या दुचाकी वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याचा य3क पाय मोडला असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
शासन आणि प्रशासनाची अनास्था – येथील सूज्ञ नागरिक आणि मीडिया च्या लोकांनी याबद्दल आपल्या आपल्या परीने ही बाब शासन आणि प्रशासनाच्या लकहात आणून दिली. आमदार आणि अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले पण पुढाकार घेऊन कोणीही यातून मार्ग काढला नाही. शासन आणि प्रशासनाने थोडे देखील लक्ष दिले असते आणि मैदानावर 2 – 4 ट्रक मुरूम अथवा विटेचा चुरा आणून टाकला असता तर ही घटना घडली नसती.
जनतेकडून आमदार आणि प्रशासनाचा तीव्र निषेध –  आज घडलेल्या घटनेमुळे नागरिकांकडून आमदार आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात येत आहे. आमदार हे तालुका क्रीडा संकुलाचे अध्यक्ष असतात. त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतरही त्यांच्या कडून कुठलीही कारवाई झाली नाही हे विशेष
आमदारांकडून मतदार संघात मैदानी स्पर्धेचे आयोजन – एकिकडे आमदारांनी क्रीडा संकुलाच्या मैदानाच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले तर दुसरीकडे हेच आमदार पक्षाच्या चिन्हांखाली मैदानी खेळाला स्कोप मिळावा म्हणून मतदार संघात मैदानी स्पर्धा आयोजित  करत आहेत. मग तरुणवर्ग मातीशी जुळून रहावा हा त्यांचा फक्त लोकांना मूर्ख बनवून स्वतःचा प्रचार करायचा फंडा आहे काय ? असा प्रश्न देखील नागरिक या अनुषंगाने उपस्थित करीत आहेत. काही तर आमदार प्रताप दादा अडसड यांना त्यांची ही तरुणाबद्दलची अनास्था फार महागात पडेल असे देखील बोलत आहेत. मागील निवडणुकीत तरुणाई आमदार प्रताप अडसड यांच्या पाठीशी असल्यानेच ते निवडून आले होते हे विशेष . 
 
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close