क्राइम

पारवा येथे युवक कांग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार

पक्ष मजबूती व येत्या 2024चे मतदार पार्श्वभूमीवर घाटंजी तालुक्यातील पारवा येथे युवक काँग्रेस ची आढावा बैठक शिवाजीराव मोघे ( राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी काँग्रेस) यांच्या अध्यक्षतेत व प्रतिभा ताई धानोरकर आमदार वरोरा भद्रावती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.त्यावेळी युवक काँग्रेस च्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले त्यात अरविंद जाधव यांची विधानसभा उपाध्यक्षपदी, अब्रार पटेल यांची घाटंजी तालुका उपाध्यक्षपदी ,संदेश तोव्हर यांची विधानसभा सरचिटणीसपदी, गजानन चिल्लावार यांची घाटंजी तालुका सचिवपदी, विशाल जाधव यांची घाटंजी तालुका सरचिटणीसपदी, रवी गेडाम,अविनाश खडसे, शेख मोसीन शेख अब्दूल गफूर स्वप्नील देवतळे,शरद आपतवार,निलेश मारपवार,मनोज सुर्तिकार, जगदीश कोमुलवार व इतर पदाधिकारी यांना प्रतिभा ताई व .शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले त्यावेळी प्रतिभाताई धानोरकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले व भविष्यातील निवडणुकीला तैयार रहा व निवडणुकीच्या कामाला लागा असे सांगितले, शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवाजीराव मोघे यांनी युवकांना मार्गदर्शन केले व देशात चालू असलेली आराजक स्थिती व मोदी सरकारच्या फसव्या योजनांची पोलखोल केली व येत्या 4-5 महिन्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक होईल त्याची सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी दखल घेऊन कामाला लागावे असे सांगितले, तसेच विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस स्वानंद चव्हाण यांनी आपल्या भाषणातून मा.प्रतिभा ताई यांना विश्वास दिला की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवारी घ्या युवकांच्या माध्यमातून निवडून आणण्याची जबाबदारी घेऊन अधिक मताधिक्य मिळवून देऊ असे सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मुद्दलवार यांनी केले तर आभार स्वानंद चव्हाण यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला जयप्रकाश काटपेल्लीवार ,जयवंत चिल्लावार,रुपेश कल्यमवार, ऐकलाख पटेल,.रफिक पटेल,मा.वैजयंती ताई ठाकरे,दशरत मोहुर्ले,पारवा येथील सरपंच संगीताताई मडावी,बालाजी पोटपिलवार, राजू दवणे,नागोराव शेडमाके, शिवराम जाधव, शबीर खान पठाण, ग्रामपंचायत सरपंच सदस्य व युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close