त्याच्या कुटुंबीयांनी ऐकाच वेळी अनुभवले आनंद आणि दुःख
बेंगळुरु / नवप्राहर मीडिया
जीवनातील सर्वोच्च आनंद आणि दुःख एकाच दिवशी मिळावं यासारखं दुर्देव दुसरं नाही. पण अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीक्षांत समारंभातून डिग्री घेऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यावर एक विचित्र परिस्थिती ओढवली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
आपल्या भागात काय लिहून ठेवले आहे हे कोणालाच माहिती नसते.म्हणून तर म्हणतात ‘ नियती चां खेळ कोणाला समजला ‘ याचा अनुभव अदित बालकृष्णन याच्या कुटुंबीया पेक्षा कोणीच सांगू शकत नाही. बेंगळुरू येथे घडलेल्या या घानेची पंचक्रोशीत चर्चा असून घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अदित बालकृष्णन असे त्या भाग्यहिन तरुणाचे नाव आहे. केरळ च्या त्रिशुर येथील रहिवासी अदीत हा सुरवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. मेहनती असलेल्या अदित ची बालपणापासून डॉक्टर व्हायची ईच्छा होती. आणि त्याने त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू केले होते. त्याने १२ वित खूप मेहनत घेतली.चांगले मार्क्स घेऊन त्याने NEET केले.त्यानंतर त्याने बेंगळुरू पासून ८०किमी लांब असलेल्या तुमकुरु इथल्या बाहरी भागातील श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस ला प्रवेश घेतला. आणि एमबीबीएस देखील चांगल्या गुणांनी पास केले. दीक्षांत समारंभात त्याला डिग्री देण्यात आली.तो कुटुंबीयासोबत डिग्री घ्यायला गेला होता. आणि येथेच अनर्थ घडला.
अशी घडली दुर्दैवी घटना –
पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अदित आपली डिग्री घेऊन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी निघाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची आई आणि नातेवाईक देखील होते. पण रस्त्यात त्याच्यावर एका विषारी सापानं हल्ला केला. त्याच्या रुमजवळच्या पार्किंगमध्येच ही घटना घडली. पण त्याला सापानं दंश केल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही.
घरी पोहोचल्यानंतर अदित अचानक कोसळला त्यानंतर त्याला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम दरम्यान अदिलच्या शरिरावर विषारी सापानं दंश केल्याचं खूण दिसून आली. पण कोणाला हे काही कळायच्या आतच त्याच्या शरिरात विष मोठ्या प्रमाणावर पसरलं होतं. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.