सामाजिक

रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई – तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे

Spread the love

 

फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांचे आवाहन

वाशिम प्रतिनिधी ; दि.१३,नोव्हेंबर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांची घटलेली संख्या तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांचा कमी झालेला ओघ या प्रमुख कारणांमुळे ही रक्तटंचाई उद्भवली आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना तर बसतोच आहे. मात्र, थॅलेसेमिया, सिकलसेल सारख्या गंभीर आजार असलेले रुग्ण व किडनीच्या विकारामुळे सतत डायलिसीसची गरज भासणाऱ्या रुग्णांची रक्ताच्या टंचाईमुळे परवड होत आहे.
एकीकडे रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे, रक्ताची उपलब्धता कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामूळे तरुणांना रक्तदान करण्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजेत.वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. रुग्णांची गैरसोय होत असून त्यांच्या नातेवाईकां हे चिंताग्रस्त होत आहेत.त्यामुळे तरुण युवक युती नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सन्मानाने आपण रक्तदान करणे गरजेचे आहे. जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळेल आणि जीवनदान मिळेल असे आवाहन युवा सामाजमिळेलर्यकर्ते माजी राष्ट्रीय युवा कोर भारत सरकार तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त(महाराष्ट्र शासन)फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की रक्तदान हे महादान आहे. आपण दर ३ते ४ महिन्याला रक्तदान केले पाहिजेत. अनेक गरजू रुग्णांना रक्तदानासाठी संघर्ष करावा लागत आहे. वेळेवरती रुग्णांना रक्त मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसाडनी होत आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण,गरोदर महिला, कर्करोगाचे रुग्ण, थैनीसिमिया, ॲनिमिया,सिकलसेल आणि अन्य अनेक जिवनसंकटात असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असून.आपण रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.नियमित रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त पेशींचे निर्माण होते.आणि रक्तदात्याचे आरोग्य उत्तम राहते. रक्तदान हा एक महान समाजसेवा आहे. या कार्यातून तरुण समाजाची जाणिव वाढवू शकतो आणि एकत्र येऊन समाजासाठी योगदान देऊ शकतो. असे आवाहन प्रदीप पट्टेबहादूर सचिन भगत, गणेश हजारे,पंकज ढाले, विशाल पट्टेबहादुर, हर्षद पट्टेबहादूर, सुरज पट्टेबहादूर, अशीष धोंगडे, अतुल ढाले, अजय राजे, अशोक गुडदे यांनी आपल्या फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केले आहे.

बॉक्स [ ]

रक्तदानाच्या प्रक्रियेत रक्ताचे अनेक प्रकारचे तपासणी केली जाते, ज्यामुळे रक्तदात्याला आपल्या आरोग्याच्या स्थितीची माहिती मिळते. व तरुणांनी रक्तदान करून इतरांना देखील प्रोत्साहित करावे, ज्यामुळे रक्तदानाची संस्कृती वाढेल.
तरुणांना रक्तदानासाठी आव्हान देताना, विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांतून आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहिम राबवावी. तसेच, रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजे रुग्णांना वेळोवेळी रक्त मिळावे. व भासत असलेला रक्ताचा तुकडा भरून निघावा – *डॉ.हरिष मुंडे – रक्त संक्रमक अधिकारी रक्तपेढी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close