अल्पवयीन मुलींनो आई-वडिलांचा घात करू नका ..त्यांचा आदर करा प्रा. वसंत हुंकारे यांनी व्याख्यानात केले प्रतिपादन
तुळसाबाई कावल विद्यालयात झाले व्याख्यान
विद्यार्थी पालक गेले गहिवरून
मुलींच्या डोळ्यात च तरळले अश्रू…
पातुर तालुका प्रतिनिधी
सद्यस्थितीत अल्पवयीन मुलींचे फसवणूक करणारे प्रेमाचे षडयंत्र समाजात फोफावत आहे
त्यातून अनेक हत्या आत्महत्येच्या घटना होत आहेत
त्यामुळे मुला मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावे आणि आई-वडिलांची फसवणूक करू नये असे विविध क्षेत्रातील उदाहरणे देत विनोद त्यानंतर भावनिक होऊन
प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या मार्ग व्याख्यान मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थित महिला मुली व पालक यांच्या काळजाचा ठाव घेत आईबाप समजून घेताना विचार मांडले बाप विषयीच्या जिव्हाळा सांगताना कार्यक्रमात अनेक मुली ढसाढसा रडल्यात
सोमवारी येथील तुळसाबाई कावल विद्यालयात आयोजित “न समजलेले आईबाप” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते
आई-वडिलांची काळजी घ्या त्यांचा आदर करा वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही जे आई-वडिलांनी वीस वर्षे मुलीचा सांभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात आणि आई-वडिलांचा विश्वासघात करून पळून जातात ज्यावेळी बाप पोलिसात तक्रार करतो आणि माझ्या मुलीचा शोध घ्या म्हणतो अशावेळी ती मुलगी वडिलाला ओळखत नाही त्यामुळे त्या बापाचे औसा घडते मुलीसाठी तो बाप अक्षरशः हंबरडा फोडतो जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते अनाथाकडून जाणून घ्या असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी यावेळी केले
तसेच सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा मोबाईलचा दुरुपयोग कसा टाळावा या संदर्भात प्रबोधन केले त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावुक झाले होते
आई वडील आणि शिक्षक हे दैवत असून सर्व समाजात प्रबोधन व्हावे जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे आई-वडिलांचा संघर्ष स्पष्ट याची जाण असली पाहिजे असे ते म्हणाले तुमचं वय काय आहे 14 वर्षाची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोखी व्यक्ती सोबत जाते तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल तुमचं 14 वर्षाचे वय हे विवाह करण्याचं आहे काय? नंतर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही असे म्हणत प्रा. वसंत हंकारे यांनी आई-वडिलांचं नातं निष्ठेने जपावं असे त्यांनी तरुण आणि तरुणींना यावेळी आवाहन केले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत तर तुळसाबाई कावल विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन सिंह गहिलोत,
या कार्यक्रमाचे आयोजक अकोला लोकसभा समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संदीप पाटील, रमेश ठाकरे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर एस ढेंगे, पर्यवेक्षिका पी.एम. कारस्कर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. निलेश पाकदूने यांनी केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तुळसाबाई कावल विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी प्रयत्न केले