सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी संपन्न

Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी संपन्न
हिवरखेड :- येथील “सर्वोदय शिक्षण समिती द्वारा संचालित” महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी *भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दातीर मॅडम, प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. नंदा थोरात (पर्यवेक्षिका) तसेच श्री जावरकर सर, श्री जोशी सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांकडून करण्यात आले.
याप्रसंगी या दोन्ही क्रांतीवीर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहाल क्रांतिकारक विभुती म्हणजे लोकमान्य तसेच तळागाळातील, वंचित समाज विकासासाठी , आपली लेखणी झिजविणारे जहाल क्रांतिकारक , साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या खडतर जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले .श्री खसारे सर यांनी या दोन्ही विभूतींबद्दल त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला .यानंतर सौ. थोरात मॅडम यांनी लोकमान्य टिळकांचे जहाल क्रांतिकारकत्व तसेच लोकशाहीर ,साहित्यसम्राट अण्णाभाऊंचे तळागाळातील वंचित असलेल्या समाजाबद्दलची तळमळ निष्ठा समजावून सांगितली . श्री पारिसे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाच्या शाळा शिक्षणातून अनेक साहित्यकृती निर्माण केली तसेच त्यांचे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीतील योगदान व जीवन कार्याबद्दल माहिती तसेच भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्व पूर्ण योगदानाबद्दल माहिती देऊन यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश व त्यांचे कर्तृत्व प्रत्येकाने विसरता कामा नये हे पटवून दिले. श्रीमती दातीर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांच्या जीवनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या दोन्ही विभुती बद्दल माहिती देऊन त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे सांगितले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्याबद्दल आभार मानले व भाषणातील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close