आएंगे तो मोदीजी ही – मुख्यमंत्री शिंदे
दिल्लीत शिंदे यांचा रुतबा वाढला ; अमित शहा आणि नड्डा यांच्या मधात देण्यात आले होते स्थान
नवी दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा
मोदी सरकारला आगामी निवडणुकीत परास्त करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. विरोधकांनी एकत्र येत INDIA या नावाने मोदी विरोधक पक्षाचे संगठन तयार केले आहे. तर NDA ने सुद्धा आपल्या सवंगड्यांना एकत्रित करणे सुरू केले आहे. या दोन्ही आघाड्यांची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मीडियाशी बोलतांना येणाऱ्या काळात मोदी पुन्हा सत्तेत येतील असा आत्मविश्वास दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसने इंदिरा गांधींसाठी दिला होता. तोच नारा मोदींसाठी दिला. मोदी म्हणजे इंडिया. इंडिया म्हणजेच मोदी, असा नाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बैठक झाली. सगळ्यांनी मोदींना खंबीर पाठिंबा दिला. मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताचा नावलौकीक जगभर वाढला आहे. जागतिक लीडर म्हणून जगभरातील नेते मोदींकडे पाहत आहेत. आगामी काळात मोदीच या देशाला आणखी सक्षमपणे पुढे नेऊ शकतात. आजच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी मोदींवर विश्वास दाखवला. महाराष्ट्राच्यावतीने आम्ही त्यांना अश्वस्त केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात 45 जागा येणार
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार 45हून अधिक जागा निवडून आणेल. त्यामुळे केंद्र सरकारला पाठबळ मिळेल. महाराष्ट्रात क्लीन स्वीप मिळेल. राज्यातील जनता केलेल्या कामाची पावती देईल. महाराष्ट्र नेहमीच मोदींच्या पाठिशी राहिला आहे. यावेळीही राहील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
330 जागा निवडून येतील
देशात लोकसभेला एनडीएच्या 330 जागा निवडून येऊ शकतात. इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवता आला नाही. एक नेता ते ठरवू शकले नाहीत. विकास करायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असं विरोधक खासगीत कबूल करतात, असंही त्यांनी सांगितलं.
मोदींच्या रांगेत शिंदे
दरम्यान, काल एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं होतं.