हटके

शारीरिक संबंधा दरम्यान तरुणीचा मृत्यू ; प्रियकराला अटक 

Spread the love

नवसारी ( गुजरात )/ नवप्रहार डेस्क

             जगात काही विचित्र घटना घडतात की त्यावर काय बोलावे आणि काय बोलू नये ? तसेच त्यावर विश्वास ठेवावा अथवा नाही असा प्रश्न स्वतःलाच पडतो. आता वयस्कर तरुणांना लॉज मध्ये आधार कार्ड दाखवल्यावर विना अडचण एन्ट्री मिळत असल्याने . प्रेमात पडलेले तरुण तरुणी बागेत अथवा अन्य ठिकाणी जाण्या पेक्षा लॉज अथवा हॉटेल मध्ये जाणे पसंत करू लागले आहेत.

                    तसेच पर्यटनस्थळी किंवा बागेत अथवा सुनसान ठिकाणी गेल्यावर बोपदेव घाटा सारख्या घटना घडत असल्याने प्रेमी युगल लॉज आणि हॉटेल ला पसंती देत आहेत. अश्यतच गुजरातच्या नवसारी येथून एक धक्कादायक घटना उजेडात आली येथे. येथे एका लॉज वर शारीरिक संबंध ठेवतांना तरुणीचा मृत्यू झाला आहे. अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

               पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भार्गव आणि रुपाली ( काल्पनिक नाव) यांचे एकमेकांवर प्रेम होते. भार्गव रुपलीला एका लॉज वर घेऊन गेला. त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. दरम्यान तरुणीच्या खाजगी अंगाच्या आत गंभीर जखमा झाल्याने तिला अतिरक्तस्त्राव झाला. भार्गव ने  तिला वेळेवर रुग्णालयात नेले नाही . काही वेळानंतर तिला जेव्हा रुग्णलयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तपासुन तिला मृत घोषित केले.

                       घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिस अधिक्षक सुशील अग्रवाल यांनी माहिती दिली की, आयपीसीच्या कलम 105,238 नुसार तक्रार दाखल करण्यात आली होती.

 पोलिसांनी आरोपी भार्गवला अटक केलीय. या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. त्यानुसारच पुढील कारवाई केली जाईल. नवसारी पोलिसांनी याप्रकरणी दिलेली माहिती अशी की, शरिरीक संबंधावेळी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखम झाल्यानं खूप रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close