हटके

आपल्याला आश्चर्य वाटेल खूप, हे पाहून की कुत्री पाजतात वाघाच्या पिल्लांना दूध 

Spread the love
 

नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया 

               मनुष्य आणि प्राण्यांना देवाने डोकं आणि भावना दिल्या आहेत. फरक फक्त इतकाच आहे की मनुष्य आपल्या भावना बोलून व्यक्त करू शकतो. पण प्राण्यांना त्या बोलून व्यक्त करता येत नाही.आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना फार कमी लोकांना समजतात. एकीकडे मनुष्य स्वार्थी होत चालला आहे.तर दुसरीकडे प्राण्यांत प्रेमभाव आजही दिसुन येतो. त्याचेच मूर्तिमंत उदाहरण या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

अलीकडेच @richie4u या Instagram अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन मादी कुत्र्यांबद्दल सांगितलं आहे. ज्यांनी वाघाच्या पिल्लांना स्वतःच्या पिल्लांप्रमाणे वाढवलं ​​आणि मोठं झाल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम राहिलं. व्हिडिओसोबत असं सांगण्यात आलं आहे की, व्हिडिओत दिसणाऱ्या पांढऱ्या कुत्र्याने वाघाच्या पिल्लांना स्वतःच्या पिल्लांप्रमाणं मानलं आणि त्यांना वाढवलं, ​​कारण या पिल्लांच्या आईने त्यांना सोडून दिलं होतं.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन्ही कुत्रे पिल्लांना दूध पाजत आहेत आणि त्यांच्यासोबत खेळत आहेत. मोठं होऊनही कुत्रा वाघाला ओरबाडताना आणि खाजवताना दिसतो पण तो काही करत नाही. वाघिणीचा आकार कुत्र्यांपेक्षा दुप्पट दिसत असला तरी ती त्यांची आई असल्याने वाघ तिला अजिबात त्रास देत नाहीत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close