क्राइम

शरद मोहोळ हत्याकांड ; ओला बुक करण्याची भोवली चूक 

Spread the love

पुणे  / नवप्रहार मीडिया

                   आरोपी कितीही हुशार असला तरी वेळेने का होईना पोलिसांच्या हाती लागण्यापासून तो स्वतःला फार काळ काही दूर ठेऊ सहकार नाही.आता शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश मारणे यालाच पाहाणं. पोलिसांना तब्बल 10 हजार किमी गोल फिरवणारा गणेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शरद मोहोळच्या हत्येपासून तब्बल 25 दिवस पोलिसांना गणेश मारणेने गुंगारा दिला होता.

पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाल्याच स्पष्ट झालंय.
कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्या हत्येच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी आणि मारणे टोळीचा म्होरक्या गणेश मारणे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोशीजवळ स्पाईनरोडला अटक केली. 25 दिवस गुंगारा देणारा गणेश मारणे तब्बल पाच राज्यात 10 हजार किलोमीटर फिरला आणि शेवटी ओला बुक करताना फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात फसला.
गणेश मारणेच्या अटकेनंतर शरद मोहोळ प्रकरणातला शेवटचा आरोपीही अटकेत गेलाय, त्यामुळे या प्रकरणात दाखल असलेल्या मोक्कातून जामीन मिळवण्याचा प्रयत्नात असलेला मारणे गजाआड गेलाय.
संदीप मोहोळच्या खुनापासून सुरू झालेलं वैमनस्य स्थानिक पातळींवर असलेल्या माथाडीच्या कंत्राटाची वाटणी, चालक सोमनाथ जाधव याला शरद मोहोळने केलेली मारहाण या कारणांमुळे शिगेला पोहोचल होतं, त्यामुळे शरद मोहोळ याचा काटा काढण्यासाठी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे एकत्र आले आणि शरद मोहोळचा गेम वाजवला, त्यामुळे संघटित गुन्हेगाराच्या संघर्षाच विक्राळ रूप पुन्हा समोर आलंय.
अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने गणेश मारणेला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आता पोलिस कोठडीत गणेश मारणे काय सांगतोय? हे पाहण महत्वाचं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close